Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मनी लॉन्ड्रिंगच्या धाकाने गमावले सात काेटी; अटकेची दाखविली...

Nashik Crime News : मनी लॉन्ड्रिंगच्या धाकाने गमावले सात काेटी; अटकेची दाखविली भिती

तीन काेटी रुपये हाेल्ड करण्यात सायबरला यश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मुंबईतील घर रिडेव्हलपमेंटला दिल्याने नाशकात भाडेत्त्वावर राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धास (Old Man) मनी लाँन्ड्रिंगची (डिजिटल हाऊस अरेस्ट) भिती घालून सायबर चोरट्यांनी (Cyber ​​Thieves) तब्बल सात कोटी रुपये उकळले आहेत. दरम्यान, तक्रार दाखल होताच, नाशिक सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन ट्रान्स्फर होणाऱ्या सात कोटी रुपयांपैकी तीन कोटी रुपये होल्ड केले आहेत. न्यायालयाच्या आदेशाने या वृद्धास फसवणूकीतील (Fraud) तीन कोटी रुपये पुन्हा मिळणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

याबाबत अधिक माहिती अशी की,मुंबई येथील खार परिसरात ८० वर्षीय वृद्ध मुलासह (Son) वास्तव्यास आहे. त्याची मुलगी अमेरिकेत स्थायिक असून वृद्धाने काही दिवसांपूर्वीच खार येथील दुकान, गाळे विकले होते. त्यानंतर आलेले कोट्यवधी रुपये त्यांनी विविध बँकांतील सेव्हिंग आणि करंट खात्यात जमा केला होते. दरम्यान, २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संशयित सायबर चोरट्यांनी त्यांना अचानक 8808812271, 918022942572 या मोबाईल क्रमांकांसह सीआयडीचे बनावट स्काईपी अकाऊंट सुरु करुन संपर्क साधला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत पसरवणारे दोन संशयित ताब्यात; आडगाव गुन्हे पथकाची कामगिरी

आम्ही व्हिजिलन्स टीमसोबत अन्स गोपनीय शाखेचे पोलीस (Police) आहोत, असे सांगितले. याचवेळी संशयितांनी वृद्धाचे आधारकार्ड कुठूनतरी मिळवत त्यावरील आधार नंबर त्यांना सांगत त्यावरुन तुमचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळले आहेत. या आधारकार्डसह वेगवेगळ्या बँक खात्यांतून तुम्ही मनी लाँन्ड्रिंग केले आहे. त्यामुळे सीआयडी, सक्तवसुली संचलनालय(ईडी) आणि सीबीआय तुमच्यावर कारवाई करत आहेत.

हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार रोजगार

तसेच तुम्हाला अटक (Arrested) करण्याची प्रक्रिया सुरु आहे असे सांगत, वृद्धाचा विश्वास बसेल, यासाठी ईडी, सीबीआयचा सही शिक्का, लोगो असलेले कागदपत्रे, अटक वाॅरंट दाखविले. त्यामुळे वृद्ध दडपणाखाली आला. त्याने भेदरलेल्या अवस्थेत तोतया पोलीस अधिकारी जे सांगतील, ते करण्यास सुरुवात केली. त्यानुसार संशयित सायबर चोरट्यांनी(तोतया पोलीस) वृद्धास विविध चार बँक खात्यांत वेगवेगळी रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यात वृद्धाने एकूण सहा कोटी ८० लाख रुपये संशयितांच्या बँक खात्यांत वर्ग केले.

हे देखील वाचा : “शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न”; जयंत पाटलांचे मोठे विधान

सायबर चोरट्यांनी खोलले खाते

वरील मोबाईल क्रमांकावरुन (Mobil Number) बोलणाऱ्या संशयितांनी ८० वर्षीय वृद्धाच्या आधारकार्डचा गैरवापर केला आहे. विविध चार ते पाच बँकांत त्याच्या नावे खाते सुरु केले. याच खात्यांतून संशयितांनी आर्थिक व्यवहार केले. याच व्यवहारांचे कागदपत्रे, ट्रान्झॅक्शन व अन्य बाबीचे खोटे पुरावे वृद्धास दाखविले. तुम्ही मनीलाँन्ड्रिग अर्थात ब्लॅक मनीचे व्हाईट मनी केले आहेत. तुमच्यावर बीएनएस कलमांसह आयकर अॅक्ट, पीएमएलए कायद्यान्वये कारवाई करण्याची भिती घातली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या