Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : सायबर चोरट्याचा नाशकात मुक्काम; मंडप व्यावसायिकास हॉटेलात डांबले

Nashik Crime : सायबर चोरट्याचा नाशकात मुक्काम; मंडप व्यावसायिकास हॉटेलात डांबले

कमिशन वाटपातही फ्रॉड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रीय स्तरावरील सायबर चोरट्यांनी (Cyber ​​Thieves) थेट नाशकातील (Nashik) एका हॉटेलात (Hotel) येत मुक्काम करून म्हसरूळमधील मंडप व्यावसायिकास कमिशनचे आमिष दाखवून त्यालाही हिसका दाखवला आहे. या संशयित मंडप व्यावसायिकाने कमिशनपोटी बँक खाते आर्थिक व्यवहारासाठी संशयित सायबर चोरट्यांना वापरण्यास दिल्याचे नाशिक शहर सायबर पोलिसांच्या (Cyber Police) तपासात समोर आले आहे. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असून अधिक लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- Advertisement -

नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik City Cyber Police Station) १२ मार्च रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासात म्हसरूळ पोलिसांच्या (Mhasrul Police) हद्दीत राहणाऱ्या एका मंडप व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात दोन तक्रारदारांची १ कोटी २८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंद असून ही रक्कम नाशिक मधील व्यावसायिकाच्या बँक खात्यात असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, मूळ दिल्लीचा असलेला एक सायबर संशयित काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आला. त्याने एका ओळखीतल्या व्यक्तीला त्याची स्किम सांगून बँकेतील करंट अकाऊंटसाठी मंडप व्यावसायिकास गळ घालण्यास सांगितले.

एकमेकांशी परिचित नसताना दोघांनी म्हसरूळ परिसरातील एका मंडप व्यावसायिकाला (Pavilion Businessmen) पैशांचे आमिष दाखवले. ‘आमच्या व्यवहाराचे पैसे तुझ्या बँक खात्यात जमा करून घेत जा. एक कोटी रुपयांच्या व्यवहारावर तुला आम्ही साठ हजार रुपये देऊ’, असे त्यांनी सांगितले. पैशांमुळे मंडप व्यावसायिकाने अज्ञातांना स्वतःची कागदपत्रे देत बँक खाते सुरू केले. चोरट्यांनी नागरिकांना फसवून त्यांची रक्कम इतर बँक खात्यातून टप्याटप्प्याने मंडप व्यावसायिकाच्या खात्यात वळती केली. कित्येक महिन्यांपासून हा ‘कमिशनखोरीचा व्यवहार’ सुरळीत सुरू होता. परंतु नाशिक पोलिसांनी हे बँक खाते गोठवल्याने संशयितांचे (Suspected) चौदा-पंधरा लाख रुपये अडकले त्यावरून मंडप व्यावसायिकाला चोरट्यांनी केवळ पंधरा हजार रुपये देत बोळवण केली.

दरम्यान, आता मंडप व्यावसायिकाच्या माहितीनुसार, मूळ संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सायबर पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रतीक पाटील, धीरज गवारे, अंमलदार मनीष धनवटे, मनोज पाटील, विकास पाटील हे करत आहेत.

तेव्हा ग्रुप तयार केला

८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत चोरट्यांनी नाशिकच्या दोघांना गंडा घातला. संशयितांनी नामांकित कंपनीच्या साधर्म्याचे व मूळ कंपनीच्या संचालकाचे नाव लावून मोबाईल क्रमांकावरून व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. त्यामध्ये सहभागी असलेल्या इतर सदस्यांनी त्यांना मोठा नफा झाल्याचे वारंवार मेजेस अपलोड केले. फिर्यादींनी नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एका लिंकवरून कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड करून दिले. त्यामार्फत पहिल्या तक्रारदाराची १ कोटी १३ लाख १० हजार व दुसऱ्या तक्रारदाराची १५ लाख ८० हजार रक्कम विविध बँक खात्यात जमा करून कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत केलेली नाही. याबाबत हरी सिंग, आरती सिंग, विश्वनाथ, डमिन, कस्टमर सर्व्हिससह ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले व समन्वय घडवणाऱ्यांवर गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात मानधन तत्त्वावर स्थानिक नागरिकांच्या नावे बँक खाते सुरू करून सायबर गुन्हेगारी होत असल्याचे उघड झाले आहे.

खासगी बँकेत खाते सुरू करून ‘कमिशन’

मंडप व्यावसायिकाच्या नावे खासगी बँकेत खाते सुरू करून त्यामध्ये होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांमागे ‘कमिशन’ देण्यात आले. नागरिकांना विविध स्वरुपाचे आमिष दाखवून लुटलेली कोट्यवधींची रक्कम नाशिकच्या मंडप व्यावसायिकाच्या ‘फर्म’च्या नावे असलेल्या बँक खात्यात वळती झाली. त्यापैकी प्रत्येकी एक कोटी रुपयांमागे साठ हजारांचे ‘मानधन’ देण्याचा शब्द दिलेल्या चोरट्यांनी मंडप व्यावसायिकाच्या हाती फक्त पंधरा हजार रुपये देत त्यालाही हिसका दाखवल्याचे यातून उघड झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...