नाशिक | Nashik
सायबर भामट्यांनी (Cyber Thieves) शहरातील काही नागरिकांसोबत संपर्क साधून शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आणि दुसऱ्या प्रकरणात हाऊस अरेस्ट करून अटक (Arrest) करण्याची भीती घालून सुमारे ७० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न
द्वारका येथील ५९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी १३ सप्टेंबरला २३ लाख रुपयांचा गंडा घातला. भामट्यांनी वृद्धेस दिल्ली पोलीस, सीबीआय (CBI) ट्रायमधून बोलत असल्याचे भासवून भीती घातली. मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभागी असल्याचे सांगत या गुन्ह्यात अटक करण्याची भीती घालून वृद्धेस २३ लाख रुपये ऑनलाईन देण्यास भाग पाडले. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत.
हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर
तर दुसऱ्या घटनेत गंगापूररोडवरील (Gangapur Road) महिला डॉक्टर व इतर चौघांना ४६ लाख ४७ हजार ३४८ रुपयांचा गंडा घातला. भामट्यांनी २२ नोव्हेंबर २०२३ ते २६ जुलैदरम्यान शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून लाखो रुपये घेत गंडा घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलीस (Police) तपास करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : परिवहन आयुक्तांसोबत आरटीओ कर्मचारी संघटनेची चर्चा फिस्कटली
आम्ही गोपनीय शाखेचे पोलीस आहोत
सायबर चोरट्यांनी आम्ही व्हिजिलन्स टीमसोबत गोपनीय शाखेचे पोलीस आहोत, असे सांगितले. याचवेळी संशयितांनी महिलेचे आधारकार्ड मिळवत त्यावरील आधार नंबर सांगत त्यावरून तुमचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळले आहेत. या आधारकार्डसह वेगवेगळ्या बँक खात्यातून तुम्ही मनी लॉण्ड्रिंग केले आहे. त्यामुळे सीआयडी, सक्तवसुली संचालनालय (ईडी), ट्राय तुमच्यावर कारवाई करत आहेत. तसेच तुम्हाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सांगत विश्वास बसेल यासाठी ईडी, सीबीआयचा सही शिक्का, लोगो असलेली कागदपत्रे, अटक वॉरंट दाखवले. त्यामुळे महिला दडपणाखाली आली. तिने भेदरलेल्या अवस्थेत तोतया पोलीस अधिकारी जे सांगतील ते करण्यास सुरुवात केली. त्यानुसार संशयित सायबर चोरट्यांनी (तोतया पोलीस) वृद्धेस विविध बँक खात्यात वेगवेगळी रक्कम भरण्यास भाग पाडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा