Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : ९२ लाख रुपये उकळले; शेअर मार्केटिंगचे आमिष

Nashik Crime : ९२ लाख रुपये उकळले; शेअर मार्केटिंगचे आमिष

एमएसईबीतील सेवानिवृत्तास फसवले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केटमध्ये (Share Market) आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त व्यक्तीस ९२ लाख रुपयांचा गंडा घातला. गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे सांगून त्यातील काही अंशी रक्कम सेवानिवृत्तास पाठवून विश्वास संपादन करून चोरट्यांनी (Theives) ही फसवणूक (Fraud) केली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

मनोहर प्रल्हाद पूर्णये (६७, रा. चैतन्य पार्क, गोविंदनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ एप्रिल ते १८ जून २०२५ या कालावधीत संशयितांनी ८१०६८७८१९७, ७७०८२०४७२५ या क्रमांकांवरून पूर्णये यांना संपर्क साधला. यानंतर टी-४ फायर्स विस्ज्डम क्लब या नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये सामील केले. त्यानंतर व्ही-१२ मनी टाटा कॅपिटल ग्रुपमधून आर्थिक गुंतवणूक (Investment) कशी फायदेशीर आहे, त्यातून बख्खळ व हक्काचा पैसा मिळतो, असे सांगून त्यांचे मनपरिवर्तन केले.

दरम्यान, काही प्रमाणात रक्कम गुंतवली असता संशयितांनी परतावा म्हणूण काही रक्कम वर्ग केली. मात्र, एकूण गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी टास्क दिले. त्यातच हे पैसे मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप पैसे भरल्यावर सर्वच रक्कम काढता येईल, असे सांगितले. तत्पूर्वीच पूर्णये यांनी ९२ लाख २ हजार रुपये विविध लिंकसह बँक खात्यावर भरले. पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक रियाज शेख करत आहेत.

ताज्या बातम्या

Rahuri : आईने दीड वर्षाच्या मुलासह संपवले जीवन

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील कोळेवाडी (Kalewadi) येथे एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला फासावर लटकवून नंतर स्वतः गळफास घेतल्याची (Mother And Child...