Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : नाशकातून अमेरिकन नागरिकांना गंडा; दोन कोटींची फसवणूक

Nashik Crime : नाशकातून अमेरिकन नागरिकांना गंडा; दोन कोटींची फसवणूक

नवीन सिडकोतील कॉल सेंटर उद्ध्वस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातून (Nashik City) चक्क सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime) नेटवर्क सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंबड परिसरातील (Ambad Area) अश्विननगरातील एका बंगल्यात विशिष्ट कंपार्टमेंटची व्यवस्था करुन हे कॉल सेंटर सुरु करुन सायबर चोरट्यांनी नाशकातून (Nashik) अमेरिकेतील नागरिकांना ‘ॲपल’ च्या नावे फोन करत तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. विदेशी चलनात ही रक्कम २ लाख ४० हजार डॉलर्स इतकी आहे. नाशिक शहर सायबर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणात मुंबई व ठाण्यात राहणाऱ्या सात जणाना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘ॲपल व मायक्रोसॉफ्ट’ कंपन्यांच्या नावाने बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. अश्विन नगरातील भूमी अपार्टमेंटसमोर असलेल्या जानकी बंगल्यात पोलिसांनी (Police) ही कारवाई केली. या कारवाईत प्रणय अनिरुद्ध जैस्वाल (वय ३०, रा. नालासोपारा, पालघर), साहिल खोकोन शेख (२४, रा. मालाड), मुकेश गजानन पालांडे (४०, रा. नालासोपारा), आशिष प्रभाकर ससाणे (२८, रा. सांताक्रुझ), चांद शिवदयाल बर्नवाल (२७, रा. मिरारोड, ठाणे),सादिक अहमद खान (२४, रा. मालवणी, मालाड) आणि समीक्षा शंकर सोनावले (२४,रा. खर्डीपाडा, ठाणे) या तरुणीसह संशयितांना अटक केली.

दरम्यान, सायबर पोलिसांना (Cyber Police) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक निरीक्षक प्रतिक पाटील, धीरज गवारे, अंमलदार मनिष धनवटे, मनोज पाटील, विकास पाटील यांनी ही कारवाई केली.

काय आहे प्रकार?

संशयित हे रात्री आठ वाजेपासून कामाला सुरूवात करायचे. अमेरिकेतल्या व्यक्तीना फोन लावून ‘तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरला आहे. हा व्हायरस काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या एका दुकानातून ‘गिफ्ट व्हाऊचर’ घ्यावे लागेल. साधारण दोनशे ते दोन हजार डॉलर्सपर्यंत व्हाऊचरची खरेदी करा’, असे सांगायचे. जाळ्यात फसलेला व्यक्ती संशयितांच्या सांगण्यावरून व्हाऊचर खरेदी करायचा. त्यानंतर संशयित ‘व्हीओआयपी’ क्रमांकावरून संबंधिताला कॉल करुन व्हाऊचरचा क्रमांक नोंदवून घेत साहू व शादाब यांना द्यायचे. त्यानंतर ‘व्हायरस क्लीन’ झाल्याचा दावा करण्यात यायचा. त्यातून संबंधितांची फसवणूक होत होती.

पुस्तकांच्या आडून गोपनीय हॉल

सर्व संशयित एकत्रितरित्या जानकी बंगल्यात रहायचे. दिवसभर आराम केल्यावर रात्री त्यांचे काम सुरू होत. तेथे इंटेरिअरनुसार एका पुस्तकांच्या कपाटामागे दरवाजा दडवण्यात आला होता. पुस्तकांचे कपाट पुढे ओढल्यानंतर त्या मागे असलेल्या दरवाजातून आत गेल्यावर संशयितांचे छोटे ऑफिस होते. त्यामध्ये लॅपटॉप व इतर यंत्रसामुग्री असल्याचे पोलिसांनी छापा टाकल्यावर समोर आले.

सखोल तपास सुरू

संशयितांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांनी नेमके किती जणांना फसवले, संशयितांनी अजून कोणत्या प्रकारची फसवणूक केली आहे, यासंदर्भातील तपास पथके करीत आहेत. संशयितांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था कोण करत होते, याचाही तपास होईल.

संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे

दृष्टीक्षेपातून

  • डिसेंबर २०२३ पासून संशयितांचे जानकी बंगल्यात वास्तव्य
  • संशयित बिपीन साहू व रॉन उर्फ शादाब हे दोघे म्होरके
  • साहू व शादाब मुंबई किंवा इतर राज्यातून टोळी चालवतात
  • २ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सची फसवणूक
  • भारतीय चलनानुसार २ कोटी ८ लाखांचा गंडा
  • संशयितांचे शिक्षण दहावी, बारावी, पदवीपर्यंत
  • सर्वजण उत्कृष्ट इंग्रजी बोलतात
  • प्रतिमहा २०-२५ हजार रुपयांचे संशयितांना पगार
  • एका आठवड्यात दोघे नागरिक फसायचे
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...