Monday, November 25, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष...

Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वर्क फ्रॉम होम आणि शेअर मार्केटमधील ट्रेडिंगच्या (Work From Home and Share Trading) गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी (Cyber Theives) शहरातील एका पुरुषासह महिलेकडून तब्बल ३७ लाख रुपये उकळले आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station)आयटी अँक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला असून अद्याप चोरट्यांचा कोणताही मागमूस काढण्यात अपयश आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले

दाखल फिर्यादीनुसार, या गुन्ह्यात टेलिग्राम आयडी धारक @ReshmiRaj01, @Vimal_kumar2, @ankal7201 आणि व्हाट्स ॲप कमांक 9601428472, 8979176751 तसेच पैसे वर्ग झालेल्या बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादीनुसार, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वरील संशयितांनी पुरुष तक्रारदारास हार्वे नॉर्मन कंपनीच्या टेलिग्राम आयडीवरुन (Telegram ID) संपर्क साधला. तुम्ही कमीत कमी रकमेची गुंतवणूक करुन घरबसल्या वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून पैसे कमवा, इंन्स्टंट परतावा बँक खात्यात वर्ग होईल.

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “पहिल्या यादीत मला उमेदवारी न दिल्यास…”; शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार खोसकरांचा काँग्रेसला इशारा

त्यासाठी आम्ही सांगितलेले टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून विश्वास संपादन केला.तेव्हा संशयितांच्या आमिषाला भुलून तक्रारदाराने तब्बल २० लाख ३७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काहीसा परतावा मिळाल्यावर काही दिवसांत संशयितांनी संपर्क नंबर बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी सल्लामसलत करुन सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद (Complaint) नोंदविली. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

महिलेसही १७ लाखांचा गंडा

वरील कालावधीत शहरातील एका महिलेस सायबर चोरट्यांनी मोबाईल व सोशल मिडियाद्वारे संपर्क साधला. यात संशयितांनी एसएमसी सिक्युरिटीज आणि १० या व्हॉटसअप ग्रुपमधील शिवांगी अग्रवाल तसेच 9601109816 या क्रमांकावरील महेश गुप्ता यांनी संपर्क साधून www.smcinvestment-cc ही लिंक शेअर केली. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केले तर दररोज व दरमहा आर्थिक परतावा खात्यात क्रेडीट केला जाईल असे सांगून इतर नागरिकांना या स्किमचा कसा फायदा झाला आहे, याचे व्हिडीओज व प्रतिक्रिया दाखविल्या. त्यानंतर महिलेस विश्वास बसल्याने तिने संशयितांनी सांगितल्यानुसार १७ लाख १० हजार रुपये बँक खात्यांत वर्ग केले. मात्र, पैसे परत मिळण्यास अनंत अडचणी येत असल्याने फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी वरील संशयितांविरोधात फिर्याद नोंदविली.तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या