Tuesday, January 27, 2026
Homeक्राईमNashik Crime : आयपीओची खरेदी भोवली; चौघांकडून सायबर चोरट्यांनी उकळले २८ लाख...

Nashik Crime : आयपीओची खरेदी भोवली; चौघांकडून सायबर चोरट्यांनी उकळले २८ लाख रुपये

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केटमधील ट्रेडिंग व आयपीओ खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (Cyber Theft) नशिक शहरातील (Nashik City) चौघा व्यक्तीकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले आहेत. चोरट्यांचा शोध लागला नसून अशा स्वरुपाचे वाढते गुन्हे सामान्यांसह पोलिसांसाठी (Police) तापदायक ठरत आहेत. यापूर्वी अशा फसवणुकांतून पोलीस, डॉक्टर, इंजनिअर, एक्स आर्मी, वकील, उद्योजकांना गंडविण्यात आले असताना काही नागरिकांना अशा रुपाने पैशांची हाव नडत आहे, असे बोलले जात आहे.

- Advertisement -

सचिन जनार्दन सानप (रा., स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर, सिडको) हे खासगी नोकरदार असून त्यांच्यासह यशवंत बापुराव पाटील, प्रितेश भिकनराव पाटील व योगेश नागोशे यांना सायबर (Cyber) चोरट्यांनी जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत व्हाटस अॅपसह टेलिग्राम व इन्स्टाग्रामवरुन संपर्क साधला. त्यानंतर, शेअर मार्केटमधील ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेंडिंग, आयपीओची माहिती देऊन जास्तीचा पैसा मिळेल, असा दावा केला. यानंतर चौघांचा विश्वास संपादन करून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यानंतर, चौघांनाही विविध व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड करून संशयास्पद लिंक शेअर केली.

YouTube video player

त्यानुसार, विविध कंपन्याचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून कमिशन मिळत असल्याचे सांगून, विविध बँक खाते व युपीआयडीवर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार, मात्र, आर्थिक गुंतवणूक (Investment) करुनही परतावा मिळत नसल्याने चौघांना संशय आला. त्यांनी संशयितांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. फसवणूक (Fraud) झाल्याचे समजताच, त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. तपास वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील तपास करत आहेत. संशयितांसह ज्या बँक खात्यांत पैसे वर्ग झाले, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी गुंतविली इतकी रक्कम

  • सचिन सानप यांनी सात लाख पंधरा हजार रुपये
  • यशवंत पाटील यांनी नऊ लाख एक हजार रुपये
  • प्रितेश पाटील यांनी सहा लाख चौदा हजार
  • योगेश नागोशे यांनी पाच लाख ६७ हजार रुपये
  • एकूण २७ लाख ९९ हजार रुपये

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...