Monday, November 25, 2024
Homeक्राईमNashik Crime News : लासलगाव कृउबा समितीच्या माजी संचालकाचा आढळला मृतदेह; घातपाताचा...

Nashik Crime News : लासलगाव कृउबा समितीच्या माजी संचालकाचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय व्यक्त

डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार

सिन्नर | Sinnar

तालुक्यातील देशवंडी शिवारात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) माजी संचालकाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याचे शनिवारी (दि. ३१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आले. त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, दामोदर भिकाजी कुटे (४७) हे लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक असून लासलगाव येथे त्यांचे स्पेअर पार्टचे शॉप आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास देशवंडी परिसरातील न्याय डोंगर नाला या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला. परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmer) याबाबत सिन्नर एमआयडीसी पोलीस (Sinnar MIDC Police) ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील वाचा : Mahavikas Agahdi Protest : ‘महाराष्ट्रद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका’; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दरम्यान, यावेळी पोलिसांना कुटे यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या