Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमNashik Crime : बेदसह बडगुजरवर मोक्का; अडचणी वाढल्या

Nashik Crime : बेदसह बडगुजरवर मोक्का; अडचणी वाढल्या

गोळीबाराचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आरटीआय कार्यकर्त्यांवर (RTI Worker) गोळीबार केल्याप्रकरणी (Firing Case) दाखल गुन्ह्यात जामिनावर असलेल्या दीपक सुधाकर बडगुजर (Deepak Badgujar) याच्यासह अटक (Arrested) केलेल्या सहा सराईत संशयितांबर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांवरील या कारवाईच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून शहर पोलिसांनी (City Police) मोक्का न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

मयूर चमन बेद (३७, रा. फर्नाडिसवाडी, नाशिकरोड), बारक्या उर्फ श्रीकांत माणिक बाकुडे (३२, रा. जेतवननगर, नाशिकरोड), टाक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे (३१, रा. जेतवननगर, नाशिकरोड), आकाश आनंद सूर्यतळ (२४, रा. नांदूरगाव), परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे (२९, रा. लक्ष्मी चौक, सिडको), प्रसाद संजय शिंदे (वय २९, रा. शिवतेज चौक, नांदूर गाब) आणि दीपक सुधाकर बडगुजर (रा. सावतानगर, सिडको) या संशयितांबर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे. सात संशयितांपैकी सहा संशयित अटक असून, दीपक बडगुजर यास अटकपूर्व जामीन मंजूर आहे.

हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड; नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे

फेब्रुवारी २०२२ मध्ये अॅड. प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर गोळीबार झाला होता. यागुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एक- एक साखळी जोडत सात संशयितांची नावे उघड करीत त्यांची धरपकड केली. त्यात दीपक बडगुजर याने गोळीबारासाठी संशयितांना सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यामुळे गुन्हेगारांनी संघटीतपणे गुन्हा केल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास करुन टोळीविरोधात मोका प्रस्ताव तयार करीत मंजुरीसाठी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्याकडे सादर केला होता.

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

दरम्यान, कर्णिक यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने या टोळीविरोधात मोक्का लावण्यात आला आहे. तसेच मयूर बेद टोळीविरोधात यापूर्वीही मोक्का लावण्यात आला आहे.सदर गोळीबार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दीपक बडगुजरला न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याची गुन्हेशाखेत (Crime Branch) हजेरी असते, असे समजते.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

राजकीय सुडापोटी कारवाई – बडगुजर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा मुलगा दीपक आणि शिवसैनिक अंकुश शेवाळे यांच्याविरुद्ध राजकीय सुडापोटी मोक्काची बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, असे शिक्सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. वरील दोघांवरही आत्तापर्यंत साधा अदखलपात्र गुन्हा सुद्धा कुठे दाखल नसताना त्यांना राजकीय दबावातून गोवण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्याने मोक्का लावला गेला हे निषेधार्ह आहे. या कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल. न्यायमंदिरात सत्याचा विजय होईल, असेही बडगुजर यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

वाट बिकटच

या खटल्याची सुनावणी मोक्का विशेष न्यायालयात होणार आहे. त्यासाठी संशयितांचा ताबा पुन्हा पोलीस घेतील. तसेच दीपक बडगुजर याचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलीस मोका न्यायालयात अर्ज करणार आहेत. तसेच या गुन्ह्याचे दोषारोपपत्र १८० दिवसांत न्यायालयात सादर करावे लागणार आहे. ऐन निवडणुकीतच बडगुजर यांच्या पुत्रावर गंभीर स्वरुपाची कारवाई झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या