Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : डॉ. सैंदाणेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

Nashik Crime : डॉ. सैंदाणेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालय (Nashik Civil Hospital) व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू बेड (अतिदक्षता विभाग) उभारण्यात अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणेस जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

- Advertisement -

डॉ. सैंदाणे यांना सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Polie) सोमवारी (दि. १२) सायंकाळी विनयनगर येथील घरातून अटक केली. मंगळवारी (दि. १३) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. करोना काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात ३०, मालेगाव सामान्य ख्णालयात १० खाटांचे आयसीयू (अतिदक्षता विभाग) तयार करण्याचे कंत्राट घेतलेल्या सीपीपीएल (मे. क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा.लि.) या बनावट कंपनीने १२ कोटींना गंडा घातला आहे. त्या कंपनीने राज्यभरातील शासकीय रुग्णालयांची कंत्राटे घेत सुमारे ४० ते ५० कोटींची शासनाची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

YouTube video player

दरम्यान, यासह १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात (५५), तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सौंदाणे (४५), तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया (५०), औषध निर्माण विभागातील फार्मासिस्ट शिरीष माळी (५८), डॉ. राहुल हड़पे (४५), सागर दिलीप चोथवे (३०), अश्विनी सागर चोथवे (२८), दिलीप राणूजी चोथवे (५५) या संशयितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...