Friday, May 9, 2025
Homeक्राईमNashik Crime : वयोवृद्ध व्यावसायिकास साडेसहा लाखांचा गंडा; दोन मिलियन डॉलरला भुलले

Nashik Crime : वयोवृद्ध व्यावसायिकास साडेसहा लाखांचा गंडा; दोन मिलियन डॉलरला भुलले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘माझे वडील निवर्तले असून त्यांच्या बँक खात्यातील (Bank Account) दोन मिलियन डॉलर मिळवून देण्यासाठी मला मदत करा’ अशा आशयाचे आर्जव करणारा ‘ई-मेल’ नाशिकमधील ७० वर्षीय वृद्धास पाठवून सायबर चोरट्यांनी (Cyber Thief) त्याला साडेसहा लाख रुपयांचा गंडा घातला.  याबाबत संशयितांवर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फसवणुकीसह आयटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

कॉलेजरोडवरील क्रोमा शोरुममागे ७० वर्षीय व्यावसायिक वृद्ध वास्तव्यास आहेत. ते २० सप्टेंबर २०२४ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत घरी असताना संशयित सायबर चोरट्यांनी व महिलांनी वृद्धास ऑनलाईन संपर्क केला. तर संशयितांनी वृद्धाशी ओळख वाढवून अवांतर विषयांवर चर्चा केली. त्याचवेळी ‘रोजलाईन एडवर्ड’ अशा नावाच्या आयडीवरून वृद्धास ई-मेल (E-Mail) करून ‘माझे वडील निवर्तले आहेत, मला त्यांच्या बँक खात्यातील दोन मिलियम डॉलर’ मिळवून देण्यासाठी मदत करा, असे सांगितले.

दरम्यान, वृद्धाने मदतीस होकार दिल्यावर संशयितांनी (Suspect) वृद्धास एचएसबीसी बँकेत खाते उघडले असून त्यात पाच मिलियम डॉलर असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. त्यानंतर पुन्हा विविध कारणे सांगून त्यांना जाळ्यात ओढले.

अशी झाली फसवणूक

त्या बँक खात्यात आमचे पाच मिलियन डॉलर जमा असल्याचे संशयितांनी वृद्धास भासवले. दरम्यान, ते पैसे विथड्रॉल करण्याच्या नावाखाली आरबीआय बँक ऑफिस नावाच्या आयडीवरून वृद्धास ई-मेल केला. यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली संशयितांनी वृद्धास वेगवेगळ्या संशयास्पद बँक खात्यांवर एकूण सहा लाख ४७हजार ९३७ रुपये भरण्यास भाग पाडले. दरम्यान, आपले पैसे गेल्याची खात्री पटताच वृद्धाने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे. आता ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या बँक खात्यांची माहिती पोलीस संकलित करत आहेत. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या