Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : बाळासाहेब पाठकच्या अडचणीत वाढ; मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा

Nashik Crime : बाळासाहेब पाठकच्या अडचणीत वाढ; मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुनील बागुल (Sunil Bagul) यांचे निकटवर्तीय बाळासाहेब पाठक (Balasaheb Pathak) याच्याविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) टॅक्सी चालकाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

संतोष अशोक भारूडकर (३०, व्यवसाय टॅक्सीचालक, रा. नंदिनीनगर, सद्‌गुरू किराणा स्टोअर्ससमोर, भारतनगर, मुंबईनाका, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०२३ व जुलै-२०२५ पर्यंत द्वाराका टॅक्सी स्टॅण्ड व श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक यांचे द्वारका येथील कार्यालयात (Office) श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक व त्यांच्यासोबत सदर युनियनचे काम पाहणारे इप्पा भाई, आसिफ काद्री ऊर्फ असिफ फायटर, आबिद इस्माईल शेख धोबी ऊर्फ आबिद भाई यांनी संगनमताने त्यांच्याकडे द्वारका टॅक्सी स्टॅण्ड येथून द्वारका ते कसारा असा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी ५० हजार रुपये रोख रक्कम घेतली.

त्यानंतर भारुडकर यांचा अपघात (Accident) झाल्याने त्यांनी सहा ते सात महिने टॅक्सी चालवण्याचे बंद केले होते. त्यांनी द्वारका ते कसारा पट्ट्याची लाईन त्यांचा साथीदार आबीद इस्माईल धोबी ऊर्फ आबीद धोबी यास देऊन पुन्हा द्वारका येथून टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करण्यासाठी गेलो असता बाळासाहेब पाठक व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा ७० हजार रुपयांची तसेच व्यवसाय चालू झाल्यानंतर प्रत्येक ट्रिपमागे १०० रुपये रोख रक्कमेची मागणी करून ती पूर्ण न केल्याने मारहाण, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची व टॅक्सी व्यवसाय करू न देण्याची धमकी दिली.

दरम्यान, याप्रकरणी पाठक याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल (Case) करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.एच. वाघ करत आहेत.

ताज्या बातम्या

Dindori Rain News : पुणेगाव धरण ९८ टक्के भरले; आठ हजार...

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे...