नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात गेल्या आठ दिवसांत सोनसाखळी चोरीच्या (Chain Stolen) डझनभर घटना घडल्याने पोलिसांच्या (Police) कार्यशैलीवर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे साखळीचोरांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरु असतानाच आरटीओ कॉर्नर येथील अश्वमेघनगरात सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्याची माहिती मिळताच युनिट एकचे (Unit One) पथक तेथे पोहोचले. तेव्हा सराईत पळून जात असतानाच चोर पोलिसांचा खेळ रंगला. याचवेळी सराईताच्या कुटुंबाने पोलिसांच्या कारवाईला विरोध करून अंमलदारांवर हल्ला केला. याचदरम्यान मुख्य सराईत पळताना खड्ड्यात पडून जखमी झाला. पथकातील अंमलदारास किरकोळ दुखापत झाली.याबाबात म्हसरूळ पोलिसांत गन्हा नोंद झाली आहे. सराईताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
किरण छगन सोनवणे (वय ३८, रा. प्लॉट नंबर १३, अश्वमेघनगर, पेठरोड पंचवटी), असे सराईत साखळीचोराचे नाव आहे. त्याच्या कुटुंबातील (Family) संशयित अलका सोनवणे, रवींद्र सोनवणे, कुमार सोनवणे, सुनिता सोनवणे, वर्षा सोनवणे यांच्यावर आर्म अॅक्टसह पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित किरण हा सराईत चेनस्नॅचर असून शहरात सुरु असलेल्या चेनस्नॅचिंगच्या काही गुन्ह्यांत किरणसह त्याचे साथीदार सहभागी असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाल्याने, गुन्हेशाखा युनिट एक आणि पंचवटी पोलिसांची (Panchvati Police) अशी तीन पथके (दि. ७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अश्वमेघनगरात पोहोचली. तेव्हा किरण हा कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याचे दिसताच पथकाने त्याला हटकले.
हे देखील वाचा : Nashik Accident : मालवाहतूक ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार
यानंतर, किरणने पळ काढला. पाठलाग सुरु असतानाच किरण खड्ड्चात पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याचवेळी किरणचा भाऊ संशयित रविंद्र यांने पथकाशी आरेरावी करून कारवाईचा निषेध केला. आरडाओरड ऐकून किरणचे कुटुंब पोहोचले. त्यांनीसुद्धा पथकावर हल्ला करुन कारवाईस अटकाव केला. त्यावेळी अंमलदार अमोल कोष्टी यांना दुखापत झाली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदिप मिटके, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने ही कारवाई सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, विलास पडोळकर व उपनिरीक्षक चेतन श्रीनंत आणि तिन्ही पथकाने केली.
दरम्यान, कल्याणनजिक आंबिवली रेल्वे स्थानकातजवळील इराणी वस्तीतील जमावाने (दि.५) अंधेरी पोलिसांवर दगडफेक केली होती. वस्तीतील एका सराईतास अंधेरी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रात्री वस्तीत पकडले. त्याला आंबिवली रेल्वे स्थानकातून नेले जात असताना जमावाने पथकाचा (Squad) पाठलाग करून तुफान दगडफेक केली होती. याचाच फायदा घेत पकडलेला सराईत पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.
हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी
तिन्ही हद्दीत गंभीर गुन्ह्यांत वाढ
अंबड, आडगाव, उपनगर, पंचवटी, म्हसरुळ, नाशिकरोड हद्दीत चोरी, प्राणघातक हल्ले, घरफोडी, चेनस्नॅचिंग व अन्य गंभीर गुन्हे वाढत आहेत. आडगावला विशांत उर्फ काळू भोये याची जमावाने हत्या केली होती. त्या निषेधार्थ दुसऱ्या संशयितांनी जाळपोळ करून दुसन्या दिवशी रास्ता रोको केला होता. त्यातच, या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे वाढीस लागले असून, गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. स्थानिक सराईत, परिसरातील टोळक्यांनी चौकाचौकात हैदोस मांडला असून गस्ती पथकाचे वाहन येण्या- जाण्याची वेळ चोरट्यांसह टवाळांना माहिती झाली आहे. त्यामुळे गस्ती वाहन मार्गस्थ होताच, सराईतांसह स्थानिक टवाळखोरांचा धिंगाणा रात्री सुरु होतो.
गोळीबाराचा दावा?
अश्वमेधनगरात घडलेल्या पाठशिवणीच्या खेळात सराईताकडून किंवा इतर संशयितांकडून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरीकांनी केला असून तशी जोरदार चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी असा काही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.
असा आहे सराईत
१) किरणवर एकूण १८ गंभीर गुन्हे
२) सन २०१७ मध्ये त्याच्या घराजवळून काढली होती धिंड सर्वाधिक १० गुन्हे पंचवटीत दाखल
३) येवल्यात दोन गुन्हे
४) चेनस्नॅचिंगच्या पैशातून बांधला टोलेजंग बंगला
५) किरणच्या कृत्यांना कुटुंबचा पाठिंबा असल्याचा पोलिसांना संशय
६० पल्सर २२० सह अन्य स्पोर्ट बाईकवरून स्नॅचिंग, साथीदारांचा शोध सुरु