नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत असलेल्या कॅनल रोड येथे झोपडपट्टीत बाप व लेकाचे भांडण झाल्याने या भांडणाचे पर्यावसन खुनात (Murder) होऊन त्यात बापाने लेकाचा (Father and Son) खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी खून करणाऱ्या बापाला अटक केली आहे.
नशेच्या धुंदीत बाप् लेकाचे भांडण झाले या भांडणात बापाने मुलाच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू मारल्याने मुलाचा उपचार दरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली असून हल्लेखोर बापाला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान चारच दिवसांपूर्वी एका आठ वर्षाच्या मतिमंद मुलावर अत्याचार करीत खून केल्याची घटना घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपनगर कॅनल रोड भागातील आम्रपाली झोपडपट्टी येथे राहणारे विठ्ठल गुंजाळ आणि त्यांचा मुलगा अनिल (वय २०) यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून काहीतरी कारणावरून सतत वाद होऊन हाणामारी होत होती. सोमवारी अशाच प्रकारे विठ्ठल गुंजाळ हे काहीतरी नशा करून आले व पुन्हा बाप लेकात भांडण झाले. यावेळी राग अनावर झाल्याने विठ्ठल यांनी अनिल याच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू फेकून मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
त्यानंतर उपस्थित नागरिकांनी (Citizens) अनिलला तत्काळ मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून उपनगर पोलीस ठाण्यात विठ्ठल गुंजाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे करीत आहेत.