Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : कुंडलवाल सावकारी प्रकरण; रोहितचे वडील पसार

Nashik Crime : कुंडलवाल सावकारी प्रकरण; रोहितचे वडील पसार

तक्रारदार समोर येईना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अवैध सावकारी करताना तक्रारदार महिलेकडून वसूल केलेल्या अवाजवी रकमेवर मुद्दल व व्याजापोटी ५० लाख रुपयांची खंडणी मागून दाम्पत्यास ठार (Killed) मारण्याची धमकी देत त्यांच्या अल्पयवीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणातील संशयित भाजप (BJP) पदाधिकारी रोहित कुंडलवाल (Rohit Kundalwal) याचे वडील कैलास बाबूलाल कुंडलवाल (५६) हे अद्याप पसारच आहेत. त्यांच्या शोधार्थ भद्रकाली पोलिसांची (Bhadrakali Police) दोन पथके पथके मागावर असून वसुलीचा तगादा व धमकीबाबत नव्याने कोणताही पीडित तक्रारदार, कर्जदार पुढे आला नसल्याचे समजते.

- Advertisement -

भाजप कामगार आघाडीचा सरचिटणीस व युवा मोर्चाचा पदाधिकारी रोहित कुंडलवाल (३४, रा. फ्लॅट-४, राधाकृष्ण बंगला, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) याने वडील कैलास यांच्या मदतीने बेकायदेशीर सावकारी केल्याचे उघड झाले आहे. रोहितसह त्याच्या वडिलांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत यासंदभनि खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करून रोहितला अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने (Court) पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. जुने नाशिक (Old Nashik) भागात राहणाऱ्या ४० वर्षीय कापड व्यावसायिक महिलेने फिर्याद दिली आहे. तिचे हुंडीवाला लेन येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. तिने व पतीने कपडे व्यवसाय थाटण्यासाठी कुंडलवाल यांच्याकडून व्याजाने १५ लाख रुपये घेतले. यानंतर २०२२ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत कुंडलवाल यांनी महिलेस दिलेल्या १५ लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी दराने तब्बल ३८ लाख रुपये वसूल केले.

त्यानंतर मुद्दल व व्याज धरून ५० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्याने संशयिताने पीडितेस कॉलेजरोडवरील बिंग तवा हाँटेल येथे बोलावून फोर्ड इंडेहर कारमध्ये जबरदस्तीने बसवून प्रसाद सर्कलजवळील जीममध्ये नेले. तेथे तिला लज्जा उत्पन्न होईल अशा शिव्या देऊन हातवारे केले. यानंतर पीडितेसह तिच्या पतीस पंचवटीतील भक्तीधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यानंतर दि. १२ रोजी दुकानात येऊन रोहितने अवाजवी पैशांची (Money) मागणी करून पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढत अश्लील कृत्य केले, असे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख करत आहेत.

पिस्तूल परवाना रद्द होणार?

दरम्यान, ज्या पिस्तुलाच्या जोरावर रोहितने पीडितेस धमकी दिली, ते अधिकृत असून त्याचा अग्निशस्त्र परवाना रोहितने भद्रकाली पोलिसांना सादर केला आहे. त्यानुसार, आता दाखल गंभीर गुन्हा किंवा जर गुन्ह्यांची संख्या, तक्रारींचे स्वरूप वाढले तर हा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...