Sunday, April 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : अज्ञात जमावाला पोलिसांना मारहाण करणे पडले महागात; पाच जण...

Nashik Crime : अज्ञात जमावाला पोलिसांना मारहाण करणे पडले महागात; पाच जण ताब्यात

उर्वरीत लोकांचा शोध सुरु

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील जामुंडा धारवाडी शिवारात (Jamunda Dharwadi Shivar) एका अज्ञात जमावाला पोलिसांना (Police) मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक (Arrested) करण्यात आली असून उर्वरीत जणांचा इगतपुरी पोलीस पथकाकडून (Igatpuri Police Team) शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३० मार्च रोजी इगतपुरी तालुक्यातील जामुंडे परिसरातील धारवाडी येथे पोलीस तपासासाठी गेले असता अज्ञात जमावाने पोलीसांचे कपडे फाडत त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धारवाडी येथील बेपत्ता असलेला तरुण भाऊ सखाराम दरवडे (वय १८ वर्ष) रा. धारवाडी हा येथील शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन मयत अवस्थेत दि.२८ मार्च रोजी आढळून आला होता. यावेळी मयताचा घातपात झाल्याच्या संशयावरून परिसरात वातावरण चांगलेच तापले होते.

यानंतर घटनास्थळी पोलीस पथक तपासासाठी गेले असता तेथे जमलेल्या अज्ञात जमावाने पोलीसांच्या तपासात अडथळा निर्माण करूण तपासातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव व सहकारी पोलीस यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठी, दगड मारत मारहाण केली होती. त्यानंतर या प्रकरणी ३७ अज्ञात व्यक्तींवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे चित्रिकरण सोशल मिडीयावर पसरताच पोलीसांनी शुटींगचा आधार घेत जमावातील संशयित आरोपींचा शोध घेत असतांना पोलीसांना मारहाण करणारे पाच आरोपी भाऊ तुळशीराम दरवडे (वय ५२) व्यवसाय शेती, संतोष उर्फ कमळू भाऊ दरवडे (वय २५), धर्मा भाऊ दरवडे (वय ३१), पंढरीनाथ जिवन आगविले (वय ४०), राजु पंढरीनाथ आगविले (वय २०) सर्व रा.धारवाडी यांना अटक केली. यानंतर त्यांची चौकशी करून इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, त्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येवून त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी (Central Jail) करण्यात आली. या संशयित आरोपींकडून पोलीसांवर हल्ला करणाऱ्या जमावातील आणखी काही जणांची नावे समोर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली. तसेच पोलिसांना मारहाण करणाऱ्या जमावातील उर्वरीत आरोपींचा पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्यासह पोलीस पथक तपास करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : रजिस्ट्रारच्या नावे काथ्याकूट; फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोडवरील (Gangapur Road) एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील (College) रजिस्ट्रारच्या चारित्र्यावर संशयित यूजरने फेक अकाऊंटवरुन शिंतोडे उडवत तिची वैयक्तिक...