Saturday, May 30, 2026
Homeक्राईमNashik Crime : गुन्हेगारांनो, आता शहर सोडा! साडेचारशे सराईत तडीपारीच्या रांगेत; पोलीस...

Nashik Crime : गुन्हेगारांनो, आता शहर सोडा! साडेचारशे सराईत तडीपारीच्या रांगेत; पोलीस आयुक्तांचा ॲक्शन मोड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

महापालिका निवडणुकीच्या (Nashik NMC) पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयाने (Nashik CP Office) शहरातील सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची धार अधिक तेज केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, निवडणुकांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडवणारे आणि राजकीय पाठबळ असलेल्या सराईतांवर लक्ष केंद्रित करत सुमारे साडेचारशे संशयितांना तडीपारीच्या रांगेत उभे केले आहे.

स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्यांवर दोन वर्षांसाठी तडीपारी, तर काही संशयितांवर निवडणूक काळापुरती हद्दपारी करण्यात येणार असल्याचे कळते. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच पो लीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्यात आला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेमुळे अनेक सराईत गुन्हेगार भूमिगत झाले असून, काहींनी जिल्ह्याबाहेरच मुक्काम वातावरणाला अनावश्यक हलवला आहे. तरी देखील वारंवार गुन्ह्यांत सापडणारे, दहशत निर्माण करणारे व निवडणूक ‘वळण’ देऊ शकणारे पोलिसांच्या रडारवर कायम आहेत. सोमवारी (दि. २२) आयुक्त कर्णिक यांनी उपायुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह आढावा बैठक घेत कारवायांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस ठाणेनिहाय कारवाया आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्या आहेत.

निवडणुकनिहाय तडीपारीची आकडेवारी

महापालिका (प्रस्तावित)- ४५० जण
विधानसभा – ३८९ जण
लोकसभा – ३१३ जण

दृष्टिक्षेपात

  • काही दोन वर्षांसाठी तर काही निवडणूक काळापुरते तडीपार
  • अनेक पोलीस ठाण्यांची यादी अपडेट
  • राजकारणाआड उद्योग करणाऱ्यांवर ‘लक्ष’
  • कारवायांचा नियमित आढावा आयुक्तालय घेणार

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...