देवळा | वार्ताहर | Deola
तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात (Phule Malwadi Area) एकाच कुटुंबातील चार जण मृत अवस्थेत आढळल्याची घटना आज (रविवारी) सकाळी घडली आहे. यामध्ये ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे दिसून येत आहे. तर पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. या सर्वांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील गोविंद बाळू शेवाळे (वय ४०) यांचा मृतदेह गळफास घेत असलेल्या अवस्थेत आढळला आहे. तर कोमल गोविंद शेवाळे (वय ३५), ख़ुशी गोविंद शेवाळे (वय ८) आणि शाम गोविंद शेवाळे (वय दीड वर्ष) यांचे मृतदेह (Dead Body) पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस (Police) निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉनस्टेबल हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील दाखल होत असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.




