Wednesday, April 22, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने खळबळ; दोन...

Nashik Crime : नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने खळबळ; दोन लहान मुलांचाही समावेश, हत्या की आत्महत्या?

देवळा | वार्ताहर | Deola

तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात (Phule Malwadi Area) एकाच कुटुंबातील चार जण मृत अवस्थेत आढळल्याची घटना आज (रविवारी) सकाळी घडली आहे. यामध्ये ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे दिसून येत आहे. तर पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. या सर्वांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील गोविंद बाळू शेवाळे (वय ४०) यांचा मृतदेह गळफास घेत असलेल्या अवस्थेत आढळला आहे. तर कोमल गोविंद शेवाळे (वय ३५), ख़ुशी गोविंद शेवाळे (वय ८) आणि शाम गोविंद शेवाळे (वय दीड वर्ष) यांचे मृतदेह (Dead Body) पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस (Police) निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉनस्टेबल हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील दाखल होत असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गृहमंत्री सुदान गुरुंग...

0
काठमांडू । Kathmandu नेपाळच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा...