Saturday, May 31, 2025
Homeक्राईमNashik Crime : चोरट्यांचा १५७ कि.मी. पाठलाग; मित्राचे घर फोडणारे पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime : चोरट्यांचा १५७ कि.मी. पाठलाग; मित्राचे घर फोडणारे पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

झटपट श्रीमंत होण्यासाठी चार ते पाच मित्रांनी आपल्याच मित्राच्या (Friend) घरी घरफोडी केल्याची घटना मुंबईनाका (Mumbai Naka) हद्दीत नुकतीत घडली होती. दरम्यान, या चोरट्यांची टीप मिळाल्याने त्यांना पकडण्यासाठी शहर गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटने चोरट्यांच्या कारचा तब्बल १५७ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला व त्यांना गजाआड केले. कारवाईत (Action) ३६ तोळे सोने व कार व इतर असा ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाबीद अल्ताफ हाश्मी (२५, रा. द्वारकानगरी, नागजी हॉस्पिटलजवळ, नाशिक), शेहबाज जावेद खान (२९, रा. श्रीजी अपार्टमेंट, वडाळारोड, नाशिक), उत्तम धोंडीराम मुंजे (३०, रा. पेगलवाडी, अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) व महेश मधुकर व्यवहारे (२७, रा. पाचआळी, भांगरे गल्ली, ता. त्र्यंबकेश्वर अशी संशयितांची नावे आहेत. मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीत दि. २४ ते २६ मे या कालावधीत भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचा (Professional) बंगला फोडून अनोळखी चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

पोलिसांचा (Police) समांतर तपास सुरू असतानाच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोनजण संशयास्पद आढळले. हा धागा पकडून तपास सुरू असताना तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सर्वच संशयित निष्पन्न केले. यानंतर अंमलदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना संशयित नाबीद व इतर हे इर्टिगा कार (एमएच ०५ ईजे ४२९८) मधून चोरीचे सोने व चांदी विक्री करण्यासाठी पहिने रोडकडे येणार असल्याची टीप मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवले. त्यांच्या सूचनेने पथकाने कार्यवाही सुरू केली. यानंतर पथकाने पहिने रोड परिसरात (Pahine Road Area) सापळा रचून संशयितांना जेरबंद केले.

नाशिक ते नगर पाठलाग

संशयित हे इटिंगा कारमधून जात असल्याचे समजताच, पथकाने नाशिकमधून अहिल्यानगरपर्यंत पाठलाग केला. तब्बल १५७ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला असता संशयितांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ केले. त्यामुळे पोलिसांना लोकेशन न मिळाल्याने त्यांना हताश होऊन माघारी फिरावे लागले. त्याचक्षणी संशयितांपैकी एक साथीदार पहिने येथील घरी येणार असल्याचे कळताच पोलिसांनी छापा टाकून त्यास पकडले.

मित्रानेच केला घात

संशयित हाश्मी हा भंगार व्यावसायिक व बंगला मालकाच्या मुलाचा मित्र आहे. पैशांची चणचण व झटपट श्रीमंतीसाठी संशयितांनी मित्राचेच घर लक्ष्य केले. हाश्मी हा गुन्हा घडल्यानंतरदेखील त्याच परिसरात थांबून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष देत होता व संशयितांना अपडेट कळवत होता. तपास भरकटण्यासाठी दिशाभूल करत होता. त्यामुळे संशयित सावध होते असे तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्दे

– पंचवीस किलोमीटर परिघातील सीसीटीव्ही पडताळले
– कर्जबाजारीपणामुळे केली घरफोडी
– संशयितांनी ओळखीतून मिळवली कार
– सर्वच संशयित सराईत गुंड, नशेबाज
– बैठकीत बसल्यावर शिजवला प्लॅन
– सीसीटीव्हीमुळे झाला उलगडा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

गोळीचे

PM Narendra Modi: “गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल”; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला...

0
भोपाळ | Bhopal पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...