Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'शेअर्स' आमिषाने चाैघे फसले; तब्बल 'इतक्या' लाखांचा गंडा, जांभूळकर...

Nashik Crime : ‘शेअर्स’ आमिषाने चाैघे फसले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा, जांभूळकर पितापुत्र पसार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर (Share Market Investment) भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नाशिककरांची लूट करणाऱ्या संशयित जांभूळकर पिता-पुत्राने पुन्हा एकदा आपला ‘धंदा’ मांडून चौघांना २७ लाख रुपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू भागात ‘आर.जे. ट्रेडर्स’ नावाने कार्यालय थाटून या दाेघांनी ही फसवणूक केली असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

​रोहित जांभूळकर आणि त्याचे वडील सिद्धार्थ जांभूळकर यांनी सेबीकडे (SB) नोंदणीकृत असल्याचे भासवून ५ सप्टेंबर २०२२ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. खासगी नाेकरी करणारे तक्रारदार विपुल प्रभाकर चव्हाण यांना त्यांनी ‘निर्मल बंग प्रा. लि.’ या नामांकित कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. विश्वास बसावा, यासाठी संशयितांनी या कंपनीचे बनावट लेटरहेड आणि बनावट स्टेटमेंट तयार करून दिले.

दरम्यान, या माध्यमातून त्यांनी चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी रोख, एनईएफटी आणि चेकद्वारे १७ लाख रुपये उकळले. केवळ चव्हाणच नव्हे, तर त्यांच्या परिचयाचे वैभव भणगे, पद्माकर बागडे आणि शेख शफीक अब्दुल रहीम यांनाही या जाळ्यात ओढले. या तिघांकडूनही अनुक्रमे ८० हजार, ४ लाख ३२ हजार आणि ४ लाख ९० हजार रुपये उकळले. एकूण २७ लाख २ हजार रुपयांची रक्कम हडप केल्यानंतर संशयितांनी (Suspected) गाशा गुंडाळला आणि पसार झाल्याचे समाेर आले आहे. 

तुरुंगातून सुटले अन् पुन्हा शिरले

​सिद्धार्थ जांभूळकर यांना शेअर ट्रेडिंगचे थोडे ज्ञान असल्याने त्यांनी मुलालाही याच मार्गाला लावले. या बाप-लेकांचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून, त्यांच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी नांदेड आणि अमरावती येथील तुरुंगात त्यांनी हवा खाल्ल्याचे समजते. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा सुधारण्याऐवजी नाशिकमध्ये नवे कार्यालय उघडून फसवणुकीचा नवा डाव मांडल्याचे उघड झाले असून नाशिकमध्ये फसवणुकीला बळी पडलेल्यांची संख्ख्या वाढण्याची दाच शक्यता आहे. तपास उपनिरीक्षक साेनवणे करत आहेत. 

मुद्दे

  • कॅनडा कॉर्नर येथील ‘बिझनेस स्क्वेअर’मध्ये आर.जे. ट्रेडर्स नावाने कार्यालय 
  • सेबीकडे नोंदणी असल्याचा बनावट दावा केला
  • नामांकित कंपन्यांचे बनावट लेटरहेड आणि गुंतवणुकीचे कागदपत्रे बनविली.
  • परकीय चलन व्यापारात नफ्याचे स्वप्न दाखवले
  • रोहित आणि सिद्धार्थ यांचे तीन ते चार ठिकाणी घरे
  • सध्या ध्रुवनगरातील घरातून पसार

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...