Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : पंपावर दरोडा टाकून ४० हजारांची रोकड लुटली

Nashik Crime : पंपावर दरोडा टाकून ४० हजारांची रोकड लुटली

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) तालुक्यातील मोहदरी घाटाच्या (Mohdari Ghat) जवळ असलेल्या वाघ मोटर्स या टाटाच्या डीईएफ पंपावर चौघांनी तलवार, कोयता, दांडे घेऊन दरोडा (Robbery) टाकत ४० हजारांची रोकड लुटल्याची घटना रविवारी (दि.१६) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

मोहदरी घाटाच्या पहिल्या वळणावर असलेल्या वन विभागाच्या (Forest Department) वनोद्यानाच्या समोरील बाजूस रस्त्याच्या कडेला प्रशांत वाघ यांचा टाटा मोटर्सचा डीईएफचा पंप एक वर्षांपासून सुरु आहे. पंपाच्या पाठीमागील बाजूस राणेखानचे जंगल असून त्याच भागातून अंधाराचा फायदा घेत चौघा दरोडेखोरांनी (Robbers) पंपाच्या कार्यालयात प्रवेश केला.

चौघांनी कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी कार्यालयाचे दार आतून बंद करुन घेतले.त्यानंतर कार्यालयात काम करणाऱ्या अक्षय पालवे याच्याकडे त्यांनी आमपला मोर्चा वळवला. चेहरे बांधलेल्या, डो्नयात कॅप व अंगात जर्कीन घातलेल्या चौघांनी तलवार, कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील जवळपास ४० हजारांची रोकड लुटली व तेथून पलायन केले. घटनेनंतर पालवे यांनी तात्काळ घटनेची माहिती वाघ यांना कळविली

दरम्यान, त्यानंतर वाघ यांनी तात्काळ पंपावर धाव घेऊन सिन्नर पोलिसांना (Sinnar Police) घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी येऊन पाहणी केली. सदरची घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी हे फूटेज ताब्यात घेतले आहे. मात्र, चौघाही दरोडेखोरांचे चेहरे बांधलेले असल्याने त्यांना ओळखणे अवघड बनले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...