Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : ओटीपी घेवून साडेचार लाख लंपास

Nashik Crime : ओटीपी घेवून साडेचार लाख लंपास

पालखेड | वार्ताहर | Palkhed

तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल नंबरचे (Mobail Number) सीमकार्ड बंद झाले असून तुम्हाला कायमस्वरूपी तुमचा मोबाईल नंबर चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला आम्ही जो संदेश पाठवला आहे आम्हाला सांगा असे जर कोणाला विचारले तर बंद झालेला मोबाईल नंबर कायमस्वरुपी चालू ठेवण्यासाठी कोणीही स्वभाविकपणे सांगून देईल.शिवाय जो संदेश किंवा फोन येतो तो नामवंत कंपनीचे नाव सांगून येत असेल तर कोणीही खरी माहिती सांगेल, असाच काहीसा प्रकार शिरवाडे वणी येथील बाळासाहेच कोंडाजी निफाडे या युवकाच्या बाबतीत घडल्याने आपल्या व वडिलांच्या बँक खात्यातील (Baml Account) साडेचार लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याने संपूर्ण कुटुंब हळहळ व्यक्त करत आहे. निफाडे यांची घरची परिस्थिती सर्व साधारण आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात निफाडे वापरत असलेला मोबाईल नंबर ९८६०४१६०९५ हा काहीही कारण नसताना सकाळी बंद करण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी ०९३५ २५९८७९९ या नंबरवरून निफाडे यांना बंद केलेल्या मोबाईल नंबरवरच फोन आला व सांगण्यात आले की, कंपनीकडून बोलतोय, तुम्हाला जर तुमचा मोबाईल कायमस्वरुपी चालू ठेवायचा असेल तर तुमच्या मोबाईलवर जो संदेश आलाय त्यात चार अंक आहेत, ते आम्हांला न केल्याने बाळासाहेब निफाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तो ओटीपी (OTP) एकदा नव्हे दोन वेळेस सांगण्यात आला. त्यानंतरही मोबाईल नंबर चालू झाला नाही. दुसऱ्या दिवशी पिंपळगाव बसवंत येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेतून निफाडे यांच्या (१३६३१०४००००११९७२) या खात्यामधून ९४ हजार हस्तांतरीत करण्यात आले तर पिंपळगाव ब. येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत बडील कोंडाजी भिवा निफाडे यांच्या सेव्हिंग खाते क्रमांक (६०२६१४८४०२१) या व पीककर्ज खाते क्रमांक (६०२६२२८६८९०) या दोन्हीही खात्यातून टप्प्याटप्प्याने ३ लाख ७० हजार ८० रुपये असे एकूण जवळपास ४ लाख ६४ हजार रुपये दोनच दिवसात हस्तांतरीत करण्यात आले. तोपर्यंत निफाडे हे वापरत असलेले मोबाईल सीमकार्ड बंदच होते.

पैशाची (Money) गरज भासल्यावर निफाडे जेव्हा ए. टी. एम. मध्ये रोख पैसे काढण्यासाठी गेले असता आपल्या आयडीबीआय बँक खात्यात असलेल्या ९४ हजार रुपयांपैकी एकही रुपया खात्यात नसल्याने हा काय प्रकार असावा म्हणून आयडीबीआय पिंपळगावच्या शाखेत चौकशी केली असता संबंधित कर्मचारीवर्गाकडून सांगण्यात आले की, तुमच्या खात्यातील संपूर्ण रकम हस्तांतरीत झाली आहे. हे ऐकून बाळासाहेब निफाडे यांना चकाच बसला. या परिस्थितीतदेखील त्यांनी स्वतःला सावरत पैशांची गरज भागवण्यासाठी पिंपळगावच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील वडिलांच्या नावे असलेल्या एटीएमतून रोख पैसे काढण्यासाठी गेले असता त्याही ठिकाणी वरीलप्रमाणे प्रकार घडला. पीककर्ज खात्यातील व सेव्हिंग खात्यातील जवळपास ३ लाख ७० हजार रु. हस्तांतरीत झाल्याचे बँकेत गेल्यावर निफाडे यांना सांगण्यात आले.

माझ्या बाबतीत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये. नागरिकांनी संपूर्ण माहितीची खात्री केल्याशिवाय आपल्या मोबाईलवर कोणालाही कोणत्याही प्रसंगाची खरी माहिती देऊ नये, त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा.

बाळासाहेब निफाडे, शिरवाडे वणी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...