Saturday, June 20, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाचताना लागला धक्का, मित्रांनीच केला हल्ला; थेट…

Nashik Crime : नाचताना लागला धक्का, मित्रांनीच केला हल्ला; थेट…

नाशकात हळदीच्या कार्यक्रमात राडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आनंदाचा सोहळा असलेल्या हळद समारंभात नाचताना लागलेल्या किरकोळ धक्क्याचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. आडगाव शिवारातील (Aadgaon Shivar) विडी कामगार नगरमध्ये शनिवारी (दि. १४) रात्री ही खळबळजनक घटना घडली. धक्का लागल्याचा जाब विचारल्याने संतापलेल्या मित्रांनीच आपल्या तडीपार मित्रावर कोयत्याने हल्ला चढवला, ज्यामध्ये त्याची हाताची थोडीशी करंगळी तुटली आहे.

- Advertisement -

विडी कामगारनगर (Vidi Kamgar) येथील तन्मय शिरसाठ यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमासाठी अमोल सोमनाथ जगळे (३५) हा उपस्थित होता. रात्रीच्या वेळी घरासमोर गाण्यांच्या तालावर सर्व मित्र नाचत असताना, संशयित सिद्धांत उर्फ भुऱ्या वंजारी याचा धक्का अमोलला लागला. जरा व्यवस्थित नाच, एवढे अमोलने म्हटल्याचा राग मनात धरून सिद्धांतेने आपल्या इतर साथीदारांना कॉल करीत बोलावून घेतले.

सिद्धांतने त्याचे मित्र संशयित पीयूष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मरकड यांना फोन (Phone) करून बोलावून घेतले. टोळक्याने अमोलला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. यावेळी याचे नेहमीचेच झाले आहे, याला आता सोडत नाही, असे ओरडत सिद्धांतने कमरेला खोचलेला धारदार कोयता काढला आणि अमोलच्या डोक्यात वार केला. अमोलने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात आडवा केला असता, वार हातावर बसला आणि त्याची करंगळी तुटली.

तडीपार गुंडावर मित्रांचाच प्रहार

विशेष म्हणजे, या प्रकरणातील फिर्यादी अमोल जगळे हा पोलिसांच्या (Police) रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर हल्ला करणारे संशयित हे त्याचेच मित्र असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आडगाव पोलिसांनी या प्राणघातक हल्ल्याचा (Attack) गुन्हा दाखल केला असून सर्व संशयितांना अटक (Arrested) केली आहे. उपनिरीक्षक कुवर या तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...