Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik Crime : रिल्सस्टारच्या हत्येचा प्रयत्न; लाखो फॉलोवर्स चोरण्यासाठी टोळक्याचे कृत्य

Nashik Crime : रिल्सस्टारच्या हत्येचा प्रयत्न; लाखो फॉलोवर्स चोरण्यासाठी टोळक्याचे कृत्य

गस्तीपथकामुळे जीव वाचला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) आठ लाख फॉलोअर्स (Followers) असल्याने या १७ वर्षीय मुलाचा इन्स्टा आयडी घेण्यासाठी तिघांनी चॉपरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कन्नमवार पुलाखाली घडला. मात्र सुदैवाने गस्तीवरील पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने तिघा संशयितांना (Suspected) पकडत दोन पीडित अल्पवयीन मुलांची सुटका केली. मारेकऱ्यांत दोन विधिसंघर्षितांचा सहभाग असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

भद्रकाली पोलीस ठाण्यातील (Bhadrakali Police Station) बीट मार्शल अंमलदार संतोष आव्हाड व अझरुद्दीन इनामदार हे शुक्रवारी (दि. ३०) रात्री गोदावरी नदी किनारी कन्नमवार पुलाजवळून गस्तीवर होते. त्यावेळी पुलाखाली पाच मुले आरडाओरड करताना आढळून आले. तसेच एकाने दुसऱ्या मुलाच्या गळ्यावर धारदार चॉपर लावल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे आव्हाड व इनामदार यांनी वेळ न दवडता घोळक्यात शिरून हत्याराचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना पकडले.

YouTube video player

तसेच त्याच्या सोबत असलेल्या दोन विधिसंघर्षीत मुलांनाही (Boys) ताब्यात घेतले. याची माहिती भद्रकालीचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना कळवत तिघा संशयितांसह दोन पीडित मुलांना भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर संशयित फरीद मन्सुरी (१९) याच्यासह इतर दोन विधिसंघर्षीत मुलांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरीद यास शनिवारी (दि.३१) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दोघा विधिसंघर्षित मुलांना निरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे.

पैसा कमावण्यासाठी घाट

सौरभ सुनील मौर्या (१७, रा. उत्तर प्रदेश) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे इन्स्टाग्रामवर दोन आयडी मिळून आठ लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिघांनी सौरभकडे इन्स्टा आयडी मागितला होता. मात्र सौरभने आयडी देण्यास नकार दिल्याने तिघांनी त्याच्यासह मित्र साहिल शेख (रा. नानावली) यास मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासानुसार, इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स विक्री करून संशयितांचा पैसे कमावण्याचा प्रयत्न होता. तसेच स्वतःचे फॉलोअर्स वाढवून त्यानंतर पैसे कमावण्यासाठीही संशयितांनी कट रचल्याचे समोर येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...