Thursday, June 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा; अखेर कुख्यात गुंड पाटणकरच्या...

Nashik Crime : दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा; अखेर कुख्यात गुंड पाटणकरच्या मुसक्या आवळल्या

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दहा महिन्यांपासून नाशिक पोलिसांना (Nashik Police) अक्षरशः नाकीनऊ आणणाऱ्या आणि शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड हर्षद पाटणकर (Harshad Patankar) याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला अखेर यश आले आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाटणकरची गुंडगिरी पोलिसांनी मोडीत काढली असून, धावत्या वाहनातून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे. या अटकेमुळे नाशिकमधील वाढत्या टोळीयुद्धाला (गँगवॉर) चाप बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

​गेल्या रविवारी (दि. १५) पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात पाटणकरने आपल्या सराईत व जुन्या मित्रावर प्राणघातक हल्ला (Attack) करून दहशत माजवली होती. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि गोळीबारासारख्या नऊ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला हा गुंड माेकळा फिरत असल्याने ‘नाशिकमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून पाटणकरचा माग काढला. तो त्याचा साथीदार श्रवण पगारे याच्यासह शहरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.

दरम्यान, पोलिसांनी घेराव घातल्याचे लक्षात येताच हर्षदने पुन्हा एकदा हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या (Police) तावडीतून सुटण्यासाठी त्याने धावत्या वाहनातून उडी घेतली, मात्र यावेळी त्याचे नशीब सोबतीला नव्हते. या धडपडीत त्याच्या पायाला दुखापत झाली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पाटणकर हा नाशिक पोलिसांसाठी (Nashik Police) डोकेदुखी ठरला होता. सध्या पाटणकरवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या अटकेनंतर शहरातील अन्य गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुद्दे

  • शरणपूर राेड, बेथेलनगर व सिडकाे भागात गोळीबार करून दहशत माजविली. 
  • तत्कालिन खास मित्र राहुल पवार आणि पाटणकर यांच्यात वाद.
  • वर्चस्वाच्या लढाईतून नोव्हेंबर २०२५ मध्ये गोळीबार. 
  • एप्रिल २०२४ मध्ये कामटवाड्यातील अल्पवयीनाच्या हत्येत सहभागाचा आराेप.
  • २०२३ मध्ये स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर थेट पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरूनच मिरवणूक काढून आव्हान दिले होते.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...