नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कौटुंबिक वादाच्या खटल्यात छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने साडेपाच वर्षांच्या मुलीचा ताबा पतीकडून पत्नीकडे देण्याचे आदेश दिल्याने पोहोचलेल्या पोलीस पथकाशी (Police Squed) हुज्जत घालून मुलीच्या (Girl) बापाने ‘धिंगाणा’ घातला. अनेक मिनिटे सुरू असलेल्या गोंधळानंतर, पोलीस व अग्रिशमन पथकाने बळाचा वापर करून व दरवाजा तोडून मुलीचा ताबा घेत खंडपीठासमोर मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द केले. तर संशयिताविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत (Mhasrul Police) शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) दलातील महिला सुरक्षा विभागाच्या म्हसरूळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित नीलेश अशोक जगदाळे (रा. उदयनगर, मखमलाबादरोड) या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद आहे. नीलेश व त्याच्या पत्नीमध्ये काही वर्षांपासून कौटुंबिक कलह सुरू आहेत. महिला सुरक्षा विभागात त्यासंदर्भात तक्रार नोंद झाल्यावर हा प्रकार छवपती संभाजीनगर येथील खंडपीठापर्यंत पोहोचला. त्यातून न्यायालयाने साडेपाच वर्षांच्या मुलीचा ताबा नीलेशऐवजी त्याची पत्नी सुवर्णा बाबुराव बागुल हिच्याकडे देण्याचे आदेश पोलिसांना दिले. दोनवेळा त्यासंदर्भातील आदेश जारी झाल्याने १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस पथक नीलेशच्या घरी दाखल झाले.
त्यावेळी नीलेश काही वरिष्ठ गैरप्रकार करण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांही सोबत नेले होते. नीलेश याने पोलीस व अग्निशमन दलाचे जवान बघताच आरडाओरड करून मुलीचा ताबा देण्यास नकार दिला. यासह पथकाच्या अंगावर धावून जात कर्मचाऱ्यांवर हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून मुलीला ताब्यात घेत नीलेश याला समज दिली. मुलीला ताब्यात घेत छत्रपती संभाजीनगर खंडपीठासमोर हजर करून तिच्या आईकडे कोर्टासमक्ष ताबा देण्यात आला. न्यायालयीन कार्यवाही पूर्ण करुन पथक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर निरीक्षक तायडे यांनी म्हसरूळ पोलिसांत संशयिताविरुद्ध फिर्याद दिली.
बाप अन् कुटुंबही गहिवरले
संशयित नीलेश याची पत्नी त्याच्यापासून काही वर्षांपूर्वी विभक्त राहत आहे. त्यांच्या कलह असून, नीलेश हा बी. ई मेकॅनिकल इंजिनिअर असला तरी बेरोजगार आहे. त्यामुळे साडेपाच वर्षांच्या मुलीचे शिक्षण व पालनपोषण करण्यात तो असमर्थ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पोलीस पथक त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याने गच्चीवर जात अरेरावी करून पथकाला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. व्याला ताब्यात घेत पुढील कारवाई करणार असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले.