Sunday, March 30, 2025
Homeक्राईमNashik Crime : प्रेमात धाेका मिळाल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : प्रेमात धाेका मिळाल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रियकराने (lover) दुसऱ्या प्रेयसीसमाेर कानशिलात लगावून मारहाण (Beating) केल्यासह प्रेमात धाेका मिळाल्याने सतरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शरणपूर राेडवरील (Sharanpur Road) बेथेलनगरात घडली. आत्महत्या केलेल्या मुलीचा प्रियकर संशयित वेदांत पाटील (वय १९, रा. सिडकाे) याला सरकारवाडा पाेलिसांनी अटक करुन त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाेंदविला आहे. संशयित वेदांत हा सराईत असून त्याच्यावर गुन्हे नाेंद आहेत. 

- Advertisement -

आत्महत्या केलेली मुलगी (Girl) ही लहानपणापासूनच बेथेलनगरातील मावशी मनिषा संताेष भालेराव यांच्याकडे वास्तव्यास हाेती. दरम्यान, तिची ओळख मागील एक वर्षापासून वेदांत पाटील याच्याशी झाली हाेती. त्यानंतर फ्रेन्डशिप झाल्याने दाेघे नेहमी नाशिकमध्ये फिरायला जात हाेते. त्यावेळी मनिषा यांनी सदर मुलीला वेदांतबाबत विचारणा केली असता दाेघेही विवाह करणार असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर, मुलीची आई रोजमेरी हिने दाेघांनाही वय अठरा पूर्ण हाेताच विवाह लावून देऊ असे सांगितले हाेते व ताेपर्यंत एकमेकांना भेटू नका अशी समज दिली होती.

समज दिली असतानाही वेदांत व सदर मुलगी हे दोघे भेटत हाेते, दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्यातच  मागील तीन दिवसापासून दोघांमध्ये सतत भांडण सुरू होते. तेव्हा आत्महत्या केलेल्या मुलीने मनीषा यांना वेदांतचे दुसऱ्या मुलीशी अफेअर असून त्याने तिच्यासमाेर मला मारहाण केल्याचे सांगितले हाेते व विवाह करणार नाही असे सांगून धमकी दिली हाेती. त्यामुळे ती तणावात हाेती. तरीही वेदांत तिच्याकडे आला व त्याने तिला फिरायला चल असे म्हणून भेट घेतली हाेती. तेव्हा तिने त्याला नकार दिल्याने त्याने तिला वारंवार मारहाण केली. त्यातच तिने (दि. २८) दुपारी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मनीषा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेदांतवर गुन्हा नाेंद झाला असून ताे टवाळखाेर असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

तिची आई चेन्नईत

सदर मुलगी ही दहावीत (SSC) असताना नापास झाल्याने मावशीकडे रहावयास हाेती. तिची आई रोजमेरी ही चेन्नई येथे खाजगी पेशंट सांभाळण्याचे तसेच इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. चेन्नईत जसे काम मिळेल तसे वेगवेगळ्या ठिकाणी मैत्रिणींसह राहण्यास आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सरकारवाडा पाेलीस (Sarkarwada Police) करत आहेत. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशीच समृद्धीने घेतला अखेरचा श्वास

0
ओझे | वार्ताहर | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये आई-वडिलांच्या (Parents) निधनानंतर गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीचेही...