Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : प्रियकराच्या 'जेलमुक्ती'साठी खंडणी; डॉक्टर तरुणीकडून उकळले दागिने, कर्ज रक्कम

Nashik Crime : प्रियकराच्या ‘जेलमुक्ती’साठी खंडणी; डॉक्टर तरुणीकडून उकळले दागिने, कर्ज रक्कम

कुंदनच्या प्रेयसीवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) काही महिन्यांपूर्वी बंदिस्त असलेला सराईत कुंदन सुरेश परदेशी याला जामिनावर सोडवण्यासाठी त्याची प्रेयसी मानसी अनामिक वाळके हिने समोरच राहणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञा महिलेकडून तब्बल ४ लाख ९७ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर ‘आम्ही गुंड आहोत, मारून टाकू’, अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कुंदनसह मानसीवर खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) मोहाडी (Mohadi) येथील ३० वर्षीय डॉक्टर तरुणी सध्या गंगापूररोड भागात कार्यरत असून काहीकाळ मखलमाबाद शिवारातील माळी मंगल कार्यालयाजवळील शतायू कारवॉ सोसायटीत वास्तव्यास होती. त्याच इमारतीसमोर कुंदनची प्रेयसी मानसी वाळके राहत असल्याने दोघींमध्ये ओळख होती. ऑक्टोबर २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सुरुवातीला मैत्रीपूर्ण वातावरण तयार करत मानसीने डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगत आर्थिक मदतीची मागणी सुरू केली.

कुंदन परदेशी हा खून, मारामारी, दहशत माजवणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत होता. त्याला जामिनावर (Bail) सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत मानसीने डॉक्टरकडून टप्प्याटप्प्याने रक्कम उकळल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कागदोपत्री नोंदीनुसार, सुमारे २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २ लाख २७हजार ५८० रुपये रोख रक्कम असे एकूण ४ लाख ९७ हजार ५८० रुपये उकळले. यात सोन्याची चेन, कानातील दागिने, अंगठी, मंगळसूत्र यांचा समावेश आहे. म्हसरूळचे उपनिरीक्षक बळवंत गावित तपास करत आहेत. सोने दिले, कर्जही काढले संशयित मानसीने आधी भावनिक आधार घेत डॉक्टरकडून मदत मागितली.

त्यानंतर रोख रकमेसाठी नेट बँकिंगद्वारे कर्ज काढण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता बजाज फायनान्सचे कर्ज काढण्यासही प्रवृत्त केल्याचे नमूद आहे. काही दिवसांनी पैसे परत मागितल्यावर कुंदन सुटून आला तर तुमचे वाईट होईल, जीव घेऊ अशी धमकी देत तक्रार न करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. सततच्या धमक्या आणि आर्थिक फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या डॉक्टर तरुणीने अखेर म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या गंगापूर पोलिसांच्या (Police) ताब्यात असलेल्या कुंदनसह मानसीचा ताबा लवकरच म्हसरूळ पोलीस घेणार आहेत.

मुद्दे

  • जानेवारीत कुंदन व मानसीचे सिडकोसह विविध भागात राडे
  • सराईत गुंड प्रणव शेवाळेचा गेम करण्याच्या उद्देश
  • सात तासांत तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी धुडगूस
  • कुंदन पंचवटीतील खुनात दोषी; मोक्का कारवाई
  • धमकी व इशाऱ्याचे रिल्य बनवल्याच्या गुन्ह्यांतही संशयित

ताज्या बातम्या

Nashik News : ‘आरोग्यवर्धिनी’वर सहा लाख नाशिककरांचा विश्वास; ओपीडीत तपासणी, शहरात...

0
नाशिक | फारूक पठाण | Nashik सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि घराजवळच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर (Arogyavardhini...