दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी पोलिस ठाण्याच्या (Dindori Police Station) हद्दीत तळेगाव दिंडोरी येथे पती पत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नी, सासू व नातेवाईकांनी काठ्या लाठ्यांनी केलेल्या मारहाणीत (Beating) पती शरद लहानू पवार याचा मृत्यू (Death) झाल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दिंडोरी (Talegaon) येथे घडला आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत शरद पवारचा तळेगाव दिंडोरी (Dindori) येथील उषा जनार्दन जाधव हिच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला होता, दोन वर्षे चांगली नांदली मात्र त्यानंतर भांडण करून ती तळेगाव दिंडोरी येथे माहेरी येऊन राहत होती. ४ वर्षांपूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी मयत शरद पवार व त्याचा मेव्हणा दिपक जनार्दन जाधव यांच्यात वाद झाला होता, तेव्हा शरद पवारने दिपक जाधवचा खुन केला होता, तेव्हा त्याच्यावर भा,द,वि कलम ३०२,६०७ प्रमाणे गुन्हा (Case) दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, ७ ते ८ महिन्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता.
दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी शरद तळेगाव दिंडोरीला आला असता पत्नीशी वाद झाल्यानंतर पत्नी सासु व इतर नातेवाईकांनी काठ्या लाठ्यांनी त्याला मारहाण केली, त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. याबाबत मयताचे वडील लहानू पवार यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश परदेशी करीत आहे.