सातपूर | प्रतिनिधी | Satpur
चारित्र्याचा संशयावरून (Suspicion of Character) रागाच्या भरात पतीने १९ वर्षीय गर्भवती पत्नीचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने (Husband) पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहिद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला. मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
अमृताकुमारी विकीरॉय यादव (१९ सध्या रा. सातपूर, मूळ नेपाळ) असे मृत पत्नीचे (Wife) नाव आहे. विकीरॉय यादव (२०) असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. पोलीस (Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील (Gangapur Road) आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी (दि. ४) सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले.
दरम्यान, चौकशीत पतीने पत्नीचा खून (Murder) केल्याची कबुली दिली. चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे, यासाठी पत्नीचा छळ केला. त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह (Dead Body) झुडूपात टाकून पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाणे करीत आहे.