Monday, April 7, 2025
Homeक्राईमNashik Crime : मध्यरात्री घरात घुसून पत्नीसह सासूच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून...

Nashik Crime : मध्यरात्री घरात घुसून पत्नीसह सासूच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न

डुबेरे | वार्ताहर | Dubere

सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) सोनारी गावात (Village of Sonari) एका तरुणाने मध्यरात्री घरात घसून पत्नीसह (Wife) सासूच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदेवाडी (Shindewadi) येथील एक तरुण रात्री सोनारीत गावात ज्वलनशील पदार्थ (In Flammable) घेऊन पोहचला. यावेळी ट्रान्सफॉर्मर बंद करुन तो घरात घुसला व काही कळायच्या आत त्याने पत्नी व सासूवर ज्वलनशील पदार्थ फेकले. या झटापटीत पतीसह पत्नी व सासू (Mother In Law) देखील गंभीर भाजली आहे.

दरम्यान, यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक (Nashik) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस उपअधिक्षकांसह पोलीसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत घटनेमागची पार्श्वभूमी जाणून घेतली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या