नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर रोडच्या (Gangapur Road) ध्रुवनगरात खंडणी व दरोड्याच्या राहणारा अवैध सावकार आणि खुनांसह गुन्ह्यांतील सराईत किशोर बरु उर्फ केबी याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) नव्याने खंडणीचा (extortion Case) गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे दहा टक्के दराने सावकारी करणाऱ्या संशयित बरुने दहशत आणि मुजोरी करीत अनेकांना ‘कंगाल’ केल्याचे समोर येत असून, लवकरच त्याला युनिट एकमध्ये आणले जाणार आहे. या निमित्ताने ‘केबी गँगची नाशकातील गुंडगिरी उघड झाली आहे. त्याचे काही टगे पसार झाले आहेत.
खंडणी व अवैधरित्या सावकारीतून उकळलेल्या पैशातून (Money) बरुने पिळदार शरीरयष्टी बनविली आहे. त्याचा पूर्वाश्रमीचा मित्र उमेश खंडू काकवीपुरे (वय ३०, रा. मल्हारखान, अशोकस्तंभ) याने रविवारी (दि. २३) पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काकवीपुरे हा शनिवारी (दि.२२) रात्री दहा वाजता पंचवटीतील दिंडोरीनाका भाजीबाजार येथे असताना, स्कॉर्पिओमधून (एमएच-१५ जेए ३००२) बरु आला. त्याने हातात चॉपर घेत गाडीतून उतरुन काकवीपुरे याची कॉलर पकडून शिवीगाळ केली.
‘तु माझ्यासोबत राहायचा, तेव्हा तुला पार्टी देऊन पन्नास हजार रुपये खर्च केले आहेत, ते पैसे मला आता दे, नाहीतर आज तुझा विषय संपवून टाकतो, अशी धमकी दिली. त्याचवेळी बरुने चॉपरने वार करण्यास सुरुवात केली असता काकवीपुरे याने त्याच्या हाताला झटका देत जीव मुठीत धरुन पळ काढला. त्यानंतर पाठलाग करुन जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकाराने दिंडोरी रोडवर (Dindori Road) पळापळ झाली. बरुच्या हातात चॉपर आणि दहशत पाहून भाजी बाजारातील लोक देखील जीव वाचविण्यासाठी पळाले. तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा बरुला अटक (Arrested) करण्यात आली आहे.
फोन करुन खंडणी मागितली
शनिवारी हा प्रकार घडताना काकवीपुरे कसाबसा बचावला. त्यानंतर, रविवारी रात्री साडेबारा वाजता बरुने काकवीपुरेस फोन करुन शिवीगाळ केली. त्याचवेळी खंडणी स्वरुपात ५० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी देखील बरुने अशाच प्रकारे काकवीपुरेस चॉपरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत पार्टी करण्यासाठी त्याच्याकडून वीस हजार रुपये खंडणी स्वरुपात उकळले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
दोन खुनांसह अकरा गुन्हे
किशोर बरुवर सन २०१० पासून नाशिक शहरात गंभीर स्वरुपाचे अकरा गुन्हे नोंद आहेत. यात, पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून आणि दरोडा, सरकारवाडा पोलिसांत प्राणघातक हल्ला, दरोड्याची तयारी, आर्म अॅक्ट, दंगल, मारहाण, तडिपारी, तसेच इंदिरानगर पोलिसांत खून आणि अंबड आणि भद्रकाली पोलिसांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.
ठळक मुद्दे
- बरु दहा टक्के व्याज दराने देतो पैसे
- पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, सिडकोत बरुची गुंडगिरी
- बरुच्या अवैध वसूलीने अनेक जण कंगाल
- स्कॉर्पिओवर अवैधरित्या फ्लशर बसवून रीलगिरी
- बरुच्या रील्समध्ये त्याच्या अंगावर दिसतं किलोभर सोने
- थरार विकास संघटनेचा सदस्य
- ‘किंग ऑफ नाशिक’ नावाने लोकांच्या मनात पसरवली दहशत
- बरु हा रविदास क्रांती सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे रील्स




