Friday, April 18, 2025
Homeक्राईमNashik Crime : नियाेजित वधूचा जाच असह्य झाल्याने आयकर खात्यातील सेवकाची आत्महत्या

Nashik Crime : नियाेजित वधूचा जाच असह्य झाल्याने आयकर खात्यातील सेवकाची आत्महत्या

चार जणांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नियाेजित पत्नीचे (Wife) परपुरुषाशी संबंध असल्याचे लक्षात येताच आयकर खात्यात (income tax department) कार्यरत नियाेजित वराने तिला विचारणा केली. मात्र, तिने उलट या वरास धमकावत लग्नास नकार दिल्यास हुंडाबळीची फिर्याद दाखल करून ‘तुला व तुझ्या कुटुंबाला रोडवर आणीन’, अशा धमक्या देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही घटना नवीन सिडकाेतील उत्तमनगर येथे घडली असून नियाेजित वधुसह तिच्या प्रियकरासह इतरांवर अंबड पाेलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहिनी पांडे असे संशयित वधूचे नाव आहे. तर हरेराम सत्यप्रकाश पाण्डेय (वय ३६, रा. देवरिया, भठवा तिवारी, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून तो सध्या नवीन नाशिकच्या उत्तमनगरातील इन्कम टॅक्स कॉलनी येथे राहत होता. २ एप्रिल २०२५ रोजी रात्री त्याने घरात आत्महत्या (Suicide) केली हाेती.

या प्रकरणी मृताचा भाऊ हरेकृष्ण पाण्डेय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहिनी पांडे, सुरेश पांडे, आणि मयंक मुनेंद्र पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरेराम याचा विवाह मोहिनीशी ठरला हाेता. मात्र मोहिनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर मानसिक दबाव टाकून, धमकावून त्याचा छळ केला. या त्रासाला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली, असा दावा मृताच्या भावाने केला आहे. या प्रकरणाचा (Case) तपास महिला उपनिरीक्षक सविता उंडे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : प्रत्येक जिल्हा न्यायाधिशाकडे दोन हजार खटले; महिला न्यायाधिशांच्या...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik सर्वच जिल्हा न्यायालयांमध्ये (Nashik District) प्रत्येक न्यायाधिशांसमोर दोन-दोन हजारांहून अधिक खटले प्रलंबित असून सन २०१७मध्ये जिल्हा न्यायाधिशांमधील (District Judge)...