नाशिक | Nashik
ओळखीचा फायदा घेऊन किंवा छेडछाडीच्या उद्देशाने संशयित विकृतांनी तीन महिलांचा विनयभंग (Molestation) केला. त्यापाठोपाठ दोन अल्पवयीन मुलींवर (Girl) अत्याचार केले. याबाबत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत (Police Station) पोक्सोअन्वये दोन तर विनयभंगाचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत काठेगल्ली येथे १२ वर्षीय पीडितेस धमकावून तिला दुचाकीवर बळजबरी बसवून एकाने कॉलेजरोड (Collage Road) येथे नेले. तसेच तेथे पीडितेचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित पियूष पाथरे याच्याविरोधात पोक्सोसह विनयभंग, अपहरणाची फिर्याद दाखल झाली आहे. भद्रकाली पोलीस (Bhadrakali Police) तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत संशयित लालाराम सुजाजी चौधरी (रा. जि. पाली, राज्य राजस्थान) याने डिसेंबर २०२४ मध्ये शरदचंद्र पवार मार्केट परिसरात महिलेचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने विनयभंग करीत शारीरिक संबंध नाही ठेवले तर आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेच्या नात्यागोत्यात बदनामी केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) संशयित चौधरी विरोधात गुन्हा दाखल आहे.
तिसऱ्या घटनेत कारमधून आलेल्या दोघांनी महिलेचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.१३) दुपारी एक वाजता चेतननानगर परिसरातून त्या पायी घरी जात होत्या. त्यावेळी एमएच १५ बीएन ६४९६ क्रमांकाच्या कारमधून संशयित विशाल शिरसाट (रा. चेतनानगर) व रोहित दिलीप जगताप (३४, रा. पाथर्डी फाटा) यांनी तिचा विनयभंग केला. दोघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत संशयित प्रसाद घुगे याने शिंदे गावातील विवाहितेचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने गुरुवारी (दि.१३) दुपारी एकच्या सुमारास मैत्री कर अशी जबरदस्ती केली. त्याचवेळी पीडितेचे पती आल्यानंतर संशयिताने पतीसोबत झटापट करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) प्रसाद विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
एकाच क्लासमध्ये शिकत असताना १६ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे त्रस्त होऊन पीडितेने अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फिर्याद दिली असून त्याच्याविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.