Sunday, January 25, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'डिजिटल' अटकेची भीती; नाशिकमधील वकिलासह व्यावसायिक, गृहिणीस ९६ लाखांचा...

Nashik Crime : ‘डिजिटल’ अटकेची भीती; नाशिकमधील वकिलासह व्यावसायिक, गृहिणीस ९६ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘तुमच्या बँक खात्यात फसवणूक (Fraud) प्रकरणांची बेहिशेबी रकम आहे. सीम कार्डही संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात आले आहेत’, असे भासवून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पोलीस अधिकाऱ्यांच्या वेशात नाशिकमधील तिघांना व्हिडीओ कॉल करुन डिजिटल अटक केली. त्यानंतर एकूण ९६ लाख रुपये उकळले आहेत. नागरिकांना घरातच थांबवून ठेवत (डिजिटल अरेस्ट) तुरुंगात धाडण्याची भिती दाखवून हे पैसे ऑनलाइन वर्ग करुन घेण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात नाशकातील ही नववी घटना असून संशयितांचा शोध सुरु झाला आहे.

- Advertisement -

शहरात वकिली व्यवसाय करणाऱ्या नीरज बापट यांना डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) करुन ५० लाख रुपये तर जयश्री जोशी यांच्याकडून ३६ लाख ९१ हजार व वृषाली पन्हाळे यांच्याकडून ९ लाख ३८ हजार रुपये उकळण्यात आले आहेत. तिघेही नाशिकमध्ये आपापल्या कामाच व्यस्त असताना संशयित सायबर चोरट्यांनी ८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आपल्याकडील ९२११९६२५२८, ८१७९३३८५९८, ८६७०४२९८२८, ७६५८८५४७६७,९०६३२९६३४९, ७६५३९९८५९४, ८७६३८५४१६८, ७००११८८९८४, ८१६७६७१६२५, ६२९४५०२६९०, ७००१०२५०६, ८६७०७७४५३२,८९६११०३६२८, ९५१४२८३९६३, ९८७५३५३७३९ व ८६७०४६०२७० या विविध सोळा व्हाट्स ॲप नंबरवरुन मेसेज व कॉलिंग केले.

YouTube video player

त्यानंतर, आम्ही इडी, सीबीआय, कस्टम तसेच क्राईम ब्रान्चमधून (Crime Branch) बोलत असल्याचे भासविले. त्यानंतर तिघांना कायदेशिर प्रक्रियेचा धाक दाखवून काही कागदपत्रे तसेच पुरावे दाखविले. तुम्ही विविध ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, बेकायदेशिररित्या पैशांची उलाढाल केली असून हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे असे दाखवून घडकी भरविली. तसेच व्हिडीओ कॉल करून अटक वॉरंट दाखविले आणि यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू तसे करा, असा दबाव तयार केला. त्याचक्षणी मोबाईलच्या (Mobile) स्क्रिनवर खाकी वर्दीवरील हुबेहूब पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे व अटक वॉरंटसह न्यायालयीन कागदपत्रांवर मोहोर असलेले कागदपत्रे पाहताच तिघे पीडित धास्तावले.

दरम्यान, तेव्हा सायबर चोरट्यांनी संधी साधून त्यांना याप्रकरणांतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला व कुठेही वाच्यता करण्यास मनाई केली. तेव्हा बनावट पोलिसांसह (Fake Police) इतर अन्वेषण यंत्रणेच्या नावाचा वापर करुन चोरट्यांनी वरील रक्कम विविध बँक खात्यांवर वर्ग करण्यास प्रवृत्त केले. पैसे मिळताच संशयितांचे नंबर बंद आढळले. तिघांनी हिंमत करुन सखोल चौकशी केली असता, त्यांना डिजिटल अरेस्ट करुन गंडा घालण्यात आल्याचे वास्तव समोर आले. वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

कायदेशिरदृष्ट्या होम वा ‘डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही. कोणतेही आर्थिक गैरव्यवहार तसेच सीमचा वापर आदी संदर्भात फोन किंवा मेसेज आले तर घाबरु नये. तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सायबरचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...