Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'समृद्धी'वर १२१ किलो गांजा पकडला; ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Nashik Crime : ‘समृद्धी’वर १२१ किलो गांजा पकडला; ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) तालुक्यातील शिवडे परिसरात (Shivde Area) दोन कारमधून १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा (Cannabis) पकडत तब्बल ३६ लाख २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरवरुन मुंबईला गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने शिवडे शिवारात समृध्दी महामार्गावर सापळा रचला होता. पथकाला मुंबईच्या दिशेने सफेद रंगाची स्विफ्ट व चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार भरधाव येतांना दिसली.

- Advertisement -

या दोन्ही वाहनांचा पथकाने (Squad) पाठलाग केला असता स्विफ्ट कारने यु-टर्न मारून नागपूर दिशेने तर अमेझ कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली. मात्र, पथकाने दोन्ही वाहनांचा पाठलाग करून स्विफ्ट कारला कोकमठाण टोलनाका परिसरात अडवले. तर अमेझ कारमधील चालकाने शिवडे परिसरात वाहन सोडून पळ काढला. ताब्यात घेतलेल्या संशयितांची व वाहनांची झडती घेतली असता वाहनांमध्ये १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा मिळून आला.

YouTube video player

पोलिसांनी दोन्ही कार, ३ मोबाईल, १५ हजारांची रोकड असा एकूण ३६ लाख २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपी भारत नारायण चव्हाण (३५), तुषार रमेश काळे (२७), संदिप कचरू भालेराव (३२) सर्व रा. नेवासा जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. सुनिल भास्कर अनार्थे रा. शिर्डी हा आरोपी फरार असून तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात (Police Station) ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.१६) पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सहाय्यक निरिक्षक जीवन बोरसे उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारूंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रितम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रविंद्र गवळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...