Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Crime : लोंढे पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी

Nashik Crime : लोंढे पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

बंगला बळकावून खंडणी (Extortion) मागितल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत (Police Custody) असलेल्या प्रकाश लोंढेसह त्याच्या मुलगा दीपक लोंढे (Prakash Londhe and Deepak Londhe) यांची पोलीस कोठडी संपली. अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली

- Advertisement -

फिर्यादी प्रमोद मधुकर अत्तरदे (वय ५४, रा. एकता ग्रीन व्हॅली, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (FIR) संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांनी त्यांचा खुटवडनगर परिसरातील सर्वे क्र. ५१, प्लॉट क्र. २ या ठिकाणी असलेला पुष्कर बंगला अनाथाश्रम सुरु करण्याच्या नावाने भाडेतत्वावर घेतला. भाडे करारनामा आठ दिवसांत करून देण्याच्या बोलीनंतर लोंढे यांनी सदर बंगल्याचा भाडे करारनामा केलाच नाही व २०२१ ते अद्यापपर्यंत भाडे देखील दिले नाही.

अत्तरदे हे त्यांच्या बंगल्यावर गेलेअसता त्याठिकाणी त्यांना लोंढे यांचे संपर्क कार्यालय असल्याचे दिसून आल्याने त्यांनी अनाथाश्रमाबाबत विचारणा केली असता दीपक व भूषण लोंढे यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही काळाने त्या ठिकाणी सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ हे कुटुंबीयांसह राहत असल्याचे आढळून आले. अत्तरदे यांनी या दोघांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की ‘बॉस प्रकाश लोंढे यांनी सांगितले आहे की हा बंगला तुम्हाला हवा असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, हे ऐकून अत्तरदे यांनी विरोध दर्शविला असता, संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) लोंढे पिता-पुत्रांसह (Londhe Father-Son) अन्य दोघांवर खंडणी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...