Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : शेअर ट्रेडिंगचा 'अनुभव' भोवला; खत कंपनीतील मॅनेजरला अडीच कोटींचा...

Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचा ‘अनुभव’ भोवला; खत कंपनीतील मॅनेजरला अडीच कोटींचा गंडा

सायबरला गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘शेअर ट्रेडिंग’चा अनुभव असतानाही जास्तीच्या आर्थिक लाभाच्या आमिषाने नामांकित खत उत्पादन कंपनीतील (Fertilizer Company) सेवानिवृत्त मॅनेजरने आयुष्याची जमापुंजी गमावली आहे. स्वतः शेअर ट्रेडिंगमधून लाभ घेतल्यानंतर तो सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकला आणि जादा आमिषापोटी सव्वा दोन कोटी रुपयांना फसला. नाशिक शहर सायबर पोलिसात सायबर चोरट्यांविरोधात (Cyber Thieves) गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

५८ वर्षीय तक्रारदार हे खासगी फर्टिलायझर कंपनीमध्ये नोकरीला (Job) होते. काही महिन्यांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. या दरम्यान त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून त्यातून ते लाभ मिळत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेअर ट्रेडिंग करताना ५ लाखांची गुंतवणूक केली होती. काही महिन्यांत त्यांना त्याचा दुप्पट परतावा मिळाला. त्यामुळे कमी दिवसात जादा परतावा मिळत असल्याने विश्वास द्विगुणित झाला. दरम्यान, जून महिन्यात त्यांना अंजली मेहता नावाच्या महिलेने संपर्क साधला आणि त्यांना रिलायन्स कॅपिटलची प्रतिनिधी असल्याचे सांगितले.

YouTube video player

त्यानंतर, मेहताने त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यावेळी तिने तक्रारदारास व्हॉटसअॅपवरील एका ग्रुपमध्येही सामील करून घेतले. त्यावरील शेअर बाजारातील माहितीसह मिळणाऱ्या लाभाचीही माहिती मिळत होती.अंजलीसह आणखी काही सायबर भामट्यांनी तक्रारदार यांना संपर्क साधून शेअर ट्रेडिंग करण्याबाबतचा सल्ला दिला. त्यावर तक्रारदार यांचा विश्वास बसला आणि त्यांनी टप्प्या-टप्प्याने संशयितांनी सांगितल्याप्रमाणे पैशांची गुंतवणूक केली. त्यांच्या बनावट अॅपवर तक्रारदार यांनी केलेल्या गुंतवणुकीवरील जादा परताव्याचीही माहिती दिली. गुंतविलेल्या रकमेवर जादा परतावा दिसत असल्याचे पाहून तक्रारदाराने आणखी गुंतवणूक केली.

दरम्यान, अशारितीने तक्रारदाराने एकूण २ कोटी, २४ लाख, ९३ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना सायबर भामट्यांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा जादा लाभ होत असल्याचे दाखविले. त्यामुळे त्याने सप्टेंबर २०२५ मध्ये संशयितांनी (Suspected) दाखविलेल्या अॅपवरील साडेचार कोटींची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे त्यांनी संशयितांकडे संपर्क साधला. त्यावेळी भामट्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तर काहीवेळा त्यासंदर्भातील प्रक्रिया करण्यासाठी आणखी पैसे भरण्यास सांगितले. या प्रकारातून तक्रारदार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर सायबर पोलिसांत तक्रार केली.

नऊ जणांची एक कोटीपेक्षा अधिकची फसवणूक

गेल्या दहा महिन्यात नऊ जणांची एक कोटीपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. शासन व पोलीसांकडून सायबर गुन्हेगारीविरोधात सातत्याने जनजागृती केली जात असतानाही जादा अमिषापोटी अनेकजण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...