नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुणे जिल्ह्यातील (Pune District) मूळशी तालुक्यात (Mulshi Taluka) असलेल्या भुकूम येथे वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाची पुनरावृत्ती नाशिकच्या गंगापुर रोडवरील (Gangapur Road) उच्चभू परिसरातील सिरिज मेडोज येथे घडली आहे. ‘माहेरुन पैसे आणावेत’, यासाठी भक्ती अथर्व गुजराथी (वय ३३, रा. सम्राट ट्रॉपिकानो) हिचा छळ झाल्याने तिने सोमवारी (दि. १९) आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे भक्ती व अवनिदेखील सन २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. दरम्यान, घटनेनंतर पसार झालेला भक्तीचा पती संशयित अथर्वसह सासरा योगेश मणीलाल गुजराथी यांना पोलिसांनी गुजरात राज्यातील नवसाहीतील वांसदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. दोघांचा ताबा गंगापूर पोलिसांकडे दिला आहे.
सराफ व्यावसाविक असलेले भक्तीचे बडील दिलीप प्रभाकर माडीवाले (वय ६१, रा. ता. लक्ष्मी नहावणरोड, येवला) यांच्या फिर्यादीनुसार, भक्ती आणि अथर्व यांचा प्रेमविवाह (Love Marriage) डिसेंबर २०१७ मध्ये झाला होता. विवाहानंतर अथर्व हा भक्तीला मारहाण करुन ‘माहेरून पैसे आणावेत’, यासाठी शारिरीक व मानसिक त्रास देत होता. या जाचास कंटाळून भक्ती ही जानेवारी २०२५ मध्ये मुलासह येवला येथील माहेरी आली होती. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनी अथर्व याने भक्तीला पुन्हा सामरी नेले. ४ मे रोजी भक्तीने पती अधर्थ हा मद्यसेवन करून त्रास देत असल्याची तक्रार भावाकडे केली होती. त्यामुळे भक्तीचे माहेरचे नातलग पुन्हा भक्तीच्या सासरी गेले. त्यावेळीही अथर्व व त्याच्या आई, बडिलांनी समजूत काढून पुन्हा तो त्रास देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे नातलग पुन्हा घरी गेले.
त्यानंतर सोमवारी (दि.१९) सकाळी भक्तीने गळफास घेतल्याचे समजले. त्यामुळे भक्तीच्या माहेरच्या नातलगांनी नाशिकला धाव घेतली. पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या (Suicide) केल्याचे माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अथर्व गुजराथी (३६, सिरीन मेडोज), सासरे योगेश मणीलाल गुजराथी व सासू मथुरा योगेश गुजराथी (दोघे रा. नवीन पंडित कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर, अथर्व यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी भक्तीच्या माहेराकडील नातलगांनी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) ठिय्या दिला होता. तर, येवला अमरधाम येथे तिच्या अंत्यसंस्कारावेळी अधर्वसह अशा प्रवृत्तींबर कठोर कारवाई व्हावी, अशा आशयाचे फलक घेऊन तीव्र निषेध नोंदविला होता. असे असताना भक्तीचा सासरा योगेश व पती अथर्व हे पसार होते.
असा लागला सुगावा
शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदारांनी तांत्रिक तपास केला असता अधर्व, योगेश व मधूरा है नवसारीत असल्याचे समजले. यानंतर, पथकाने (दि. २४) बोसदा पोलिसांच्या हद्दीतील गुजरात वनविकास मंडळालगतच्या क्नील उद्योग नौलाड येथून अथर्व (वय-३५) व योगेश गुजराथी (वय-६५, रा. ठक्कर ट्रेझर) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. अथर्वधी (एमएच १५. जेएम ७४२१) ही कार व मोबाईल असा एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिठके यांच्या सूचनेने पथकाने ही कारवाई केली आहे.
भक्ती होती ॲडव्होकेट
भक्ती ही पेशाने वकील होती. परंतु ती प्रक्टिस करत नव्हती. तिचा पती अथर्व व गुजराथी कुटुंब हे सधन कुटुंबातील असून अथर्व हा पंचवटीत बि-बियाणे व कृषी औषधांच्या खरेदी व विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याचे वडील त्याला साथ देत होते. सासुशी पटत नसल्याने अथर्व व भती हे सिरिज मेडोज येथे भाडेतत्वावर राहत होते, असे तपासात समोर आले असून तिघांनाही पैशांची चणचण नव्हती.
मक्तीच्या मुलाचा ताबा तिच्या आई-वडिलांना दिला आहे. मक्तीच्या कुटुंबाच्या मागणीनुसार हा खटला लक्ष्म्यासाठी सरकारी वकील सुधीर कोतवाल यांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. हा खटला ‘फास्टट्रॅक’ वर चालविण्यासह संशयितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
चित्रा वाघ, आमदार, भाजप
शवविच्छेदन अहवालानुसार भक्तीने गळफास घेतायाचे स्पष्ट आहे तिने व्हॉटस्अॅप चंटिंग कर मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल मैत्रिणीसह आई-वडील व भावासोबत चर्चा केली होती, त्या चंटिंगसह इतर तांत्रिक पुराव्यांद्वारे पुढील तपास करीत आहोत.
पद्मजा बढे-चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग
ठळक मुद्दे
* गुन्हा चहल्यावर तिधे संशयित नवसारीत गेले. तेथून तिघेही २०-२० किलोमीटर अंतरावर स्वतंत्र राहिले.
* पोलिसांना ट्रेस लागू नये म्हणूण शक्कल लढविली.
* सासू मधुरा व सून भक्तीचे एकमेकांशी पटत नव्हते भक्ती व अथर्वला पाच वर्षाचा मुलगा.
* मुलगा वडिलांकडे असताना भक्तीने गळफास घेतला.
* योगेश याला नवसारीतील महराजा गेस्ट हाऊसमधून ताब्यात घेतले.
* भक्ती व अथर्व है बालवयापासून परिचित, १० वर्षांपासून प्रेमसंबंध,
* भक्ती व अथर्कच्या प्रेमविवाहाला कुटुंबातून होता विरोध,
* अथर्वचे बँकॉक व भारतात काही मुलींसोबत फोटो
* अनैतिक संबंधांच्या संशयातून दोघांत वाद
* भक्ती दोन-अडीच महिने माहेरी होती, काही दिवसांपूर्वीच सासरी आली होती.
* तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी