Friday, May 29, 2026
Homeक्राईमNashik Crime : नोकरीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाकडून लैंगिक अत्याचार!

Nashik Crime : नोकरीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाकडून लैंगिक अत्याचार!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नोकरीच्या शोधात शहरात (City) आलेल्या एका तरुणाने ज्या नातलगांनी त्याला आसरा दिला, त्यांच्याच विश्वासाला तडा देत विवाहितेवर अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना अंबड परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील (Case) मुख्य संशयित हर्षल रमेश परदेशी (१९) याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील एका तांड्यावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.

हर्षल हा बारावीपर्यंत शिकलेला आहे. काही दिवसांपूर्वी तो रोजगाराच्या शोधात नाशिकमध्ये (Nashik) आला. ओळखीच्या नात्याने त्याने नाशिकमधील एका विवाहित नातलगाच्या घरी आश्रय घेतला. विवाहितेचा पती कामावर गेल्याची संधी साधून हर्षलने पीडितेचा हात धरून गैरवर्तन केले. विवाहितेने प्रतिकार केला असता तिचे हात ओढणीने बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.घटनेनंतर संशयित हर्षल नाशिकमधून पसार झाला.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आदेश देताच युनिट दोनचे हवालदार मनोहर शिंदे आणि चंद्रकांत गवळी यांना आरोपी त्याच्या मूळ गावी लपल्याची पक्की माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या सूचनेने पथकाने तातडीने नागद (कन्नड ग्रामीण) गाठले. पोलिसांची चाहूल लागताच हर्षलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने त्याला एका तांड्यातून झडप घालून पकडले. पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या (Ambad Police) स्वाधीन करण्यात आले.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...