Saturday, May 24, 2025
Homeक्राईमNashik Crime : एमडी, भांगचे अठ्ठावन्न गुन्हे; ८६ लाखांच्या मुद्देमालासह १२७ संशयित...

Nashik Crime : एमडी, भांगचे अठ्ठावन्न गुन्हे; ८६ लाखांच्या मुद्देमालासह १२७ संशयित अटकेत

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहर पोलिसांच्या (City Police) एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने नोव्हेंबर २०२३ पासून १६ मे २०२५ या कालावधीत एमडी, गांजा, चरस, भांग अशा अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्या व सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. यात एकूण ५८ गुन्हे दाखल करुन पथकाने ८६ लाख, ९८ हजार, १५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

शहरात अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात सापडत चालल्याचे चित्र आहे. अनेक तरुणतरुणी मद्य, सिगारेटसह अंमली पदार्थांच्या विळख्यात आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण यांना सूचना देत अंमली पदार्थ विक्री करणारे, बाळगणारे व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत कारवाई केली आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) एनडीपीएस पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या पथकानेही शहरात विशेष मोहिमा राबवून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ५८ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ७३१ ग्रॅम एमडी, २९२ किलो गांजा, ३२६ किलो ९७२ ग्रॅम भांग आणि ४९ ग्रॅम वजनाचे चरस असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या