Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिकचे 'एमडी नेटवर्क' उलगडणार; तस्करांच्या संपर्कातील फरार हवालदार अखेर...

Nashik Crime : नाशिकचे ‘एमडी नेटवर्क’ उलगडणार; तस्करांच्या संपर्कातील फरार हवालदार अखेर ‘सरेंडर’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एमडी (MD) तस्करांशी पाचशेहून अधिक वेळा मोबाईलवरुन (Mobile) संपर्क केल्यासह थेट तस्करीत सहभाग उघड झाल्याने पोलीस दलातून निलंबन झाल्यावर बडतर्फ होत फरार असलेला हवालदार संशयित युवराज शांताराम पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या पुढील तपासात नाशिकमधील (Nashik) एमडी तस्करी व खबऱ्यांसह एकूणच नेटवर्कचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

सन २०२३ मध्ये मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीत ‘छोटी भाभी’, अर्जुन पिवाल, सागर शिंदेसह इरफान उर्फ चिपड्या या संशयितांसोबत (Suspect) संपर्कात राहिल्याच्या आरोपात युवराज पाटील बुधवारी (दि. ९) अटक करुन नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वडाळा गावात ‘छोटी भाभी’च्या मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनडीपीएस) तपासात शहर पोलीस दलातील पाटील याचा सहभाग उघड झाला आहे.

YouTube video player

त्यानंतर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये युवराज पाटील याचे निलंबन करून त्याला संबंधित गुन्ह्यात सहसंशयित करण्यात आले होते. दरम्यान, सन २०२३ मध्ये ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलचा नाशिकच्या सामनगाव येथील एमडी कारखाना उद्धस्त झाल्यावर शहरातून ‘छोटी भाभी’, सनी पगारे व अर्जुन पिवाल या दोन मोठ्या टोळ्यांसह आतापर्यंत सहा-सात टोळक्यांना एमडी तस्करीत अटक (Arrested) झाली होती.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणातील संशयितांसोबत संशयित पोलीस (Police) युवराजचे संबंध तपासात समोर आले. त्याने एमडी व गोवंश तस्करी गुन्ह्यातील संशयितांशी फोनवर संपर्क साधत पाचशे ‘कॉल’ केल्याचा अहवाल गुन्हे विभागाकडे आहे. बडतर्फीनंतर पाटील हा अखेर दीड महिन्यांनी अमली पदार्थविरोधी पथकासमोर बुधवारी (दि.९) ‘सरेंडर’ झाला. अधिक तपास गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) करीत आहेत

ताज्या बातम्या