Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Crime News : पित्याकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

Nashik Crime News : पित्याकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नराधम पित्याने (Father) गतिमंद मुलीस मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकरोड येथील पळसे गावात घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात पित्याविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

YouTube video player

पळसे गाव परिसरातील पीडित मुलीच्या आईने (Mother) दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या पित्याने बुधवारी (दि.२८) दुपारी ३. ३० वाजता अत्याचार केला. पीडिता ही अल्पवयीन व गतिमंद आहे. पित्याने तिला घरात नेत मारहाण केली तसेच तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलिसांकडे (Nashik Road Police) तक्रार केली.

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

त्यानुसार संशयिताविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून नातलगांकडूनच चिमुकलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. याआधीही जिल्ह्यात पित्याने चिमुकलीवर अत्याचार (Rape) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...