Sunday, May 18, 2025
Homeक्राईमNashik Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी; मित्रांनी सात लाख रुपये उकळले

Nashik Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी; मित्रांनी सात लाख रुपये उकळले

नाशिकरोड | Nashik Road

- Advertisement -

सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर आणि बाल वयातच मिळालेली मोबाइलची सवय किती घातक ठरू शकते, याचे एक धक्कादायक उदाहरण नाशिकमध्ये (Nashik) समोर आले आहे. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने आपल्या वर्गातीलच मुलीला विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तब्बल सहा ते सात लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच शाळेत शिकतात. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये ती दोन मुलांच्या संपर्कात आली. हळूहळू मैत्री वाढत गेली आणि एकाने तिला इंस्टाग्रामवर खाती उघडण्यास सांगितले. त्यानेच तिचे इंस्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) तयार करून दिले.

पुढे चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग सुरु झाले. त्यावेळी तिने घरातील लॉकरमधून पैसे घेऊन स्वतःसाठी नवीन महागडा मोबाईल (Mobile) देखील खरेदी केला. या नात्यात एका मुलाने तिचा विश्वास संपादन करत तिला विवस्त्र व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. नंतर तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला वेळोवेळी पैशांची मागणी करू लागला. घाबरून ती त्याला लागणारे पैसे देत राहिली.

पुढे त्याच्या मित्राने (Friend) आणि बहिणीनेही अशाच प्रकारे धमकी देऊन तिच्याकडून पैसे घेतले. एकूण मिळून तिच्याकडून सुमारे ६ ते ७ लाख रुपये वसूल करण्यात आले. काल पीडितेच्या आईला तिचा मोबाईल सापडल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. मुलीने सर्व घडलेला प्रकार आईला (Mother) सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Solapur Fire : सोलापुरातील अग्नितांडवात ८ जणांचा मृत्यू; १३ तासानंतर बाहेर...

0
सोलापूर | Solapur सोलापूर शहरातील (Solapur City) अक्क्लकोट रोड एमआयडीसी परिसरातील (MIDC Area) सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला आज (रविवारी) सकाळी भीषण आग लागल्याची घटना...