Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : 'बेपत्ता' अकाऊंटंटची आत्महत्या; दुकानमालक भावांची बाउन्सरकरवी मारहाण

Nashik Crime : ‘बेपत्ता’ अकाऊंटंटची आत्महत्या; दुकानमालक भावांची बाउन्सरकरवी मारहाण

छळाला कंटाळून नदीत घेतली उडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर पोलिसांच्या हद्दीतील (Gangapur Police Station Area) राका कॉलनीतील होलसेल मोबाईल विक्री दुकान चालविणाऱ्या संशयित भावांनी दुकानातील अकाऊंटंटने पैशांचा अपहार केल्याचा आरोप करीत बाऊन्सरकरवी मारहाण केल्याने त्याने आनंदवली येथील गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रविण अरुण धनाईत (वय २९, रा. आराध्या स्पार्कल, यमुनानगर, चांदशी शिवार) असे आत्महत्या केलेल्या मृत अकाउंटंटचे नाव आहे.

- Advertisement -

या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली असून मृत अकाउंट तरुणाच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दुकानमालकांविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप करुन ‘मुलाच्या आत्महत्येस दोघे भाऊच कारणीभूत आहेत’ असे नमूद केले आहे. त्यानुसार, अमोल जीवनलाल समदडीया व तुषार जीवनलाल समदडीया या संशयित भावांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. अरुण धनाईत यांनी (दि. २३) रोजी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, प्रविण हा पाच वर्षांपासून राका कॉलनीतील समदडिया यांच्या ‘क्रिएशन टेलिकॉम’ या होलसेल मोबाईल दुकानात अकाउंटंटचे काम करत होता.

YouTube video player

जुलै २०२५ मध्ये अमोल व तुषार यांच्यासोबत त्याचा काहीतरी वाद झाला होता. तेव्हापासून त्याने काम सोडले होते. असे असताना, दहा दिवसांनंतर, समदडिया यांनी अकाऊंटंट प्रविणसह इतर नऊ जणांविरोधात वणी पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. याबाबत प्रविणला कल्पना नव्हती. गुन्हा नोंद होण्यापूर्वी समदडिया यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला. ‘तो परत करतो’ असे सांगून दुकानात बोलावून घेतले व वणी पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, खोटी तक्रार करुन ‘मला गोवण्यात आले आहे’, असे सांगून प्रविणने वडिलांकडे विनंती केली. त्यामुळे वडिलांनी त्याचा जामिन करवून घेतला. तो १० डिसेंबरपासून कुटुंबासह राहत असताना खचल्याने अबोल झाला होता. तसेच, समदडिया यांच्या दहशतीखाली वावरत होता. तत्पूर्वीच समदडिया यांनी त्याला दुकानात बोलावून घेत बाउन्सरकरवी जबर मारहाण केली होती. त्यात त्याचा एक दातही पडला. हा संपूर्ण घटनाक्रम त्याने वडील अरुण यांना सांगितला. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत (Police) तक्रार करण्याची तयारी दर्शविली. मात्र, प्रविण दहशतीखाली वावरत असल्याने व आपल्या कुटुंबाच्या जीवास धोका असल्याचे सांगून त्याने तक्रार केली नाही.

बेपत्ता झाल्यानंतर आढळला मृतदेह

अरुण हे पतसंस्थेत कामाला असून प्रविण २२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री दहा वाजता त्याने वडिलांना फोन करुन घरी येत आहे असे कळविले. परंतु तो रात्र उलटूनही परतला नाही. त्याचा शोध घेण्यात आला व नंतर गगापूर पोलिसांत ‘मिसिंग’ दाखल करण्यात आली. शोध सुरु असतानाच, (दि. २३) सकाळी प्रविणची बहिण दीपाली भास्कर हिने वडिल अरुण यांना ‘चांदशीकडील पुलावर काय झाले आहे?’ हे पाहण्यास सांगितले. ते पोहोचले असता त्यांना नदीपात्रात प्रविणचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यानंतर, अरुण यांनी फिर्याद नोंदविली. तपास सहायक निरीक्षक हर्षल आहिरराव करत आहेत.

मुद्दे

  • समदडियाचे बाऊन्सरही अडकणार
  • वणी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार, गुन्ह्याची कागदपत्रे मागविली
  • गंगापूर पोलीस तांत्रिक विश्लेषणासह आत्महत्येचे नेमके कारण शोधणार
  • समदडिया भावंडाना अटक झाल्यावरच घटनेचा उलगडा शक्य
  • कॉल डिटेल्स, मोबाईल चॅट्स, आर्थिक व्यवहारांची तपासणी

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...