नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकाली पोलीस ठाण्यातील (Mumbai Naka Police) पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोहर कारंडे यांच्या बदलीसाठी पस्तीस लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि ग्रामीण पोलीस दलातील (Rural Police Force) पोलिसांकडून त्यांच्या बदलीसाठी दोन लाख रुपये उकळणाऱ्या संशयित सागर बाळासाहेब पांगरे या भंगार कंत्राटदाराला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, पोलीस खात्यांतर्गत विनंती अर्जएिवजी त्रेहस्थांमार्फत (एजंट) आर्थिक देवाणघेवाण करुन बदलीच्या प्रयत्त्नात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या (Suspected) धुक्यात अडकत चालले आहे. त्यामुळे संबंधित निरीक्षकासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचीही खात्यांतर्गत चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. बदलीच्या प्रयत्नात असलेल्या निरीक्षकाने दोन पोलीस ठाण्याच्या ‘कलेक्टर्स’ची मदत घेतल्याचे समजते.
नाशिकरोड पोलीस ठाण्यातील (Nashik Road Police Station) अमलदार प्रशांत नागरे यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसांत ग्रामीणचा पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे व खासगी ठेकेदार सागर पांगरे-पाटील या दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सपकाळेने पाटीलच्या मदतीने नागरे यांना ‘व्हॉटसअॅप कॉल’ केला. ‘माझी संबंधितांशी ओळख असून, भद्रकालीच्या सध्याच्या दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात ‘वरिष्ठ’ निरीक्षकपदी बदली करुन देतो.
त्यासाठी भेटून बोलू’, असे सांगितले. त्याने नागरेसह निरीक्षकांना बोलावून घेतले. तर, संशयिताच्या मोबाइलवर नागरे व इतरांनी फोन करुन ‘रेकॉर्डिंग’ केली. तेव्हा ‘दुसरे निरीक्षक पस्तीस द्यायला तयार आहेत. मी पाच कमी करतो. तीसपेक्षा कमी होणार नाही. जर साहेब पंचवीसच्या वर द्यायला तयार नसतील तर बदलीचे काम होणार नाही’, असा दावा त्याने केला होता.
दरम्यान, पांगरेने ग्रामीण पोलीस दलातील दोघांना दोन लाखांना गंडा घातला. मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत गौतम भिकन चोराळे (वय ३७) यांनी त्याबाबत मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली, बोराळे व नितीन सपकाळे या दोघांकडून स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे बदलीसाठी त्याने दोन लाख रुपये घेतले. हे पैसे ऑनलाइन स्वरूपात घेतल्यानंतर आणखी एक लाखांची मागणी करुन ‘तुमची कोठेही बदली करून नुकसान करण्याची धमकी दिली. दरम्यान सपकाळे हा खंडणी प्रकरणातील संशयित असल्याचे समजते.
‘डील राहिली!
संबंधित निरीक्षक व शहरातील अनेक पोलीस ठाण्यांचे ‘कलेक्टर’ संशयिताला भेटण्यासाठी गेले व त्यातील काहींनी क्रिम पोस्टिंगसाठी गैरपद्धतीने आणि बदलीसाठी प्रयत्न के ल्याने त्यांच्या चौकशीसह कारवाईची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस दलातील अन्य कोणी सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे, असे कळते.
मुद्दे
- पांगरे हा शिंदे गटाशी संबंधित. * भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक
- पांगरेचे प्रशासकीय अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधींसोबत फोटो.
- बदलीसाठी पैसे घेतले जात नसल्याचा आयुक्तालयाचा दावा,
- बदलीसाठी संबंधित निरीक्षकाने तोंडी विनंती केल्याचे कळते.




