Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : अनैतिक संबंधातून खून; श्वान पथकाने शाेधला करंजाळीच्या घाटात मृतदेह

Nashik Crime : अनैतिक संबंधातून खून; श्वान पथकाने शाेधला करंजाळीच्या घाटात मृतदेह

चाैघे अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हसरूळ शिवारात राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाहून युवकाचा (Youth) चार संशयितांनी (Suspected) अपहरण करून गळा आवळत खून करुन मृतदेह पेठ तालुक्यातील करंजाळीतील सावळ घाटात दिला होता. दरम्यान, मंगळवारी (दि. १८) रोजी पंचवटी पाेलिसांनी तपास कत घटनास्थळी जाऊन श्वानपथकाच्या मदतीने तरुणाचा मृतदेह (Dead Body) धुंडाळून काढला आहे. श्रीकांत भीमराव उबाळे (वय २१, रा. वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी, पंचवटी, मूळ रा. परभणी) असे मृताचे नाव आहे. 

- Advertisement -

 श्रीकांत बेपत्ता असल्याबाबत गुरुवार (दि. १३) रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात समाधान चिंतामण गायकवाड (रा. शांतनगर, मखमलाबाद रोड) यांनी तक्रार दाखल केली हाेती. केटरिंगचे काम करणारा श्रीकांत बेपत्ता असल्याने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी पथकास तपासाच्या सूचना केल्या. त्याचवेळी श्रीकांतचे पोकार कॉलनीतील श्रेया दीपक काकडे या महिलेसोबत प्रेमसंबंध हाेते व तिला भेटण्यासाठी ताे गेला असता तिचा पती संशयित दीपक याने श्रीकांतला जबर मारहाण (Beating) केली आणि संशयित राहुल शेळके, सविता काकडे, चंद्रकात कुलकर्णी यांनी रिक्षा (एमएच १५ एफ एन २४६४) मध्ये टाकून अपहरण केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक विलास पडोळकर, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार सानप आदींनी संशयितांना संगमनेर व अकोले येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी संशयितांना म्हसरूळ पोलिसांच्या (Mhasrul police) ताब्यात दिले. अधिक तपासात संशयितांनी श्रीकांतची हत्या करुन करंजाळी भागातील घनदाट सावळघाट येथे फेकून दिल्याचे निष्पन्न झाल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके यांच्यासह दहा पोलिसांचे पथक संशयितांसह घटनास्थळी रवाना झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने मंगळवारी पथक पुन्हा शोधासाठी गेले. तेव्हा मंगळवारी (दि. १८) घाटातील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून केल्याचे उघड झाले असून संशयित पाेलीस काेठडीत आहेत. 

श्वान पथकाचे हवालदार गणेश कोंडे, अरुण चव्हाण, नाना बर्डे यांनी श्वान गुगल यास श्रीकांतचा टॉवेल सुंगण्यास दिला. तेव्हा सोडले असता सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतरावर असलेल्या मृतदेहाकडे गूगलने कूच करत मृतदेह शाेधून काढण्यात माेलाची कामगिरी बजावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...