Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : पैसे देऊन मिळवली बनावट नोकरी; नाशकातील तरुणीची सहा लाखांची...

Nashik Crime : पैसे देऊन मिळवली बनावट नोकरी; नाशकातील तरुणीची सहा लाखांची फसवणूक

धुळ्यात रॅकेट सक्रिय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘धुळे महापालिकेत क्लार्क पदावर नोकरी देतों, असे सांगून रॅकेटने नाशिकमधील (Nashik) तरुणीकडून सहा लाख रुपये मिळवित धुळे महानगरपालिका (Dhule NMC) आयुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा खळबळजनक प्रकार ध्रुवनगर परिसरात घडला आहे. ओळखीतील व्यक्तीनेच ही फसवणूक (Fraud) केल्याचे समोर आले असून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्यांचे रॅकेट धुळे व नाशिक जिल्ह्यात सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. जालिंधरनाथ अशोक मोरे (वय ३०, रा. साई सुदर्शन कॉलनी, स्वराज्य जिमच्या समोर धुळे) व पुरुषोत्तम अनिल वाघ अशी संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

गंगापूर पोलिसांच्या (Gangapur Police Station) हद्दीतील ध्रुवनगर येथील अथर्व हाईट्स येथे निलेश नामदेव तुपलोंढे (वय ५०) हे वास्तव्यास असून ते नोकरदार आहेत. त्यांची मुलगी कांचन शिक्षित असून ती नोकरीच्या शोधार्थ प्रयत्नशील होती. अशातच तुपलोंढे यांच्या ओळखीतील जालिधरनाथ हा त्यांच्या मालकीतील श्रमिकनगरात असलेल्या ‘पीजी’ रुममध्ये भाडेतत्वावर वास्तव्य करू लागला. तसेच तो जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत सातपूर येथील एका महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरी करत होता. कालांतराने त्याने तुपलोंढे यांच्याशी ओळख वाढवून ‘माझे मित्र धुळे व नंदूरबार महापालिकेत उच्च पदावर कार्यरत आहेत, माझी त्यांच्याशी ओळख असून कांचनला धुळे महापालिकेत नोकरी लावून देतो’, असे आमिष दाखवले.

YouTube video player

नोकरीची (Job) गरज व जुनी ओळख असल्याने तुपलोंढे यांनी मोरे व वाघ याला सहा लाख पंधरा हजार रुपये आरटीजीएस, कॅश व फोन पे मार्फत पाठविले. याच कालावधीत मोरे व साथीदाराने तुपलोंढे यांच्या पीजी रूममधून बस्तान हलवून धुळ्यात मांडले. दरम्यान, तुपलोंडे यांनी सहा लाख रुपये व नोकरीबीबत विचारले असता मोरे याने काम अंतिम टप्य्यात असल्याचे सांगून लवकरच ‘जॉइनिंग लेटर’ मिळेल असे सांगितले.

तेव्हा काही दिवसांनी कांचनला धुळे महापालिकेत क्लार्क पदावरील (Clerk Post) नोकरीचे लेटर आले. तिने खात्री केली असता तिला संशय आला. तिने धुळे महापालिका गाठून माहिती घेतली असता अशी कोणतीही पदभरती झाली नसल्याते तिला सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने वडिलांसह गंगापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली, तपास सहायक निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत.

आकडा वाढणार

मोरे व टोळीने अशाच प्रकारे नाशिक व धुळ्यातील अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. सध्या मोरे हा बेरोजगार असून त्याने कंत्राटी नोकरी सोडली असून त्याला कामावरून कमी केल्याचे समजते. त्याच्यासह साथीदारांनी संगनमत करून रॅक्ट कार्यरत केल्याचे समोर येत आहे. सध्या तो व वाघ पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. नाशिक व धुळे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून या रॅकेटेने अनेकांना गंडवल्याचे समोर येत असून तक्रारदारांची व फसवणुकीतील रक्कमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

“माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे” शिंदे सेनेच्या आमदाराचे...

0
सांगली | Sangliजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी...