Saturday, September 26, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कारागृह ठरले असते टोळीयुद्धाचा आखाडा; १२ कुख्यात संशयित...

Nashik Crime News : कारागृह ठरले असते टोळीयुद्धाचा आखाडा; १२ कुख्यात संशयित तीन जिल्ह्यांतील जेलमध्ये रवाना

सुमीत पगारे हत्याकांडात पोलिसांचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकराेड ढवळून काढणाऱ्या बहुचर्चित सुमीत पगारे हत्याकांडानंतर नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा टोळीयुद्धाची (गँगवार) ठिणगी पडण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र, नाशिकरोड पोलिसांच्या धोरणात्मक निर्णयामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Jail) संभाव्य रक्तपात आणि थेट तुरुंगातच भडकणारा गँगवार ऐनवेळी टळला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या १२ सराईत संशयितांना सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने परजिल्ह्यांतील तीन वेगवेगळ्या मध्यवर्ती कारागृहांत रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

सुमीत पगारे याच्या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या (Police) हाती २१ संशयितांची यादी लागली. यापैकी १२ जणांना आतापर्यंत गजाआड करण्यात यश आले आहे. मात्र, या तपासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मृत सुमीत पगारे याचा भाऊ सनी पगारे (Sunny Pagare) आणि त्याचे काही साथीदार आधीपासूनच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. जर हत्याकांडातील पिवाल टोळीशी संबंधित संशयितांना याच कारागृहात ठेवले, तर भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कारागृहाच्या चार भिंतींच्या आतच दोन्ही गट आमनेसामने येऊन गँगवार भडकण्याची दाट शक्यता होती.

तुरुंगात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिकरोड पोलिसांनी (Police) संशयितांची रवानगी इतर जिल्ह्यांत केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

​नऊ पसार संशयितांवर नजर

पिवाल टोळीशी संबंधित उर्वरित नऊ संशयित अजूनही फरार आहेत. यात शिवा पिवाल, राहुल सोनवणे, राजु शेख, जमीर रंगरेज, रोशन फेल्टे, रोहित नेरे, दर्शन गांगुर्डे, अमजद उर्फ मामू शेख आणि आदिल सय्यद यांचा समावेश आहे. या सर्व फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके परराज्यात व इतर जिल्ह्यांत रवाना करण्यात आली असून त्यांनाही लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यांची या कारागृहात रवानगी

​छत्रपती संभाजीनगर कारागृह : अर्जुन पिवाल, आशिष पिवाल, मुन्ना गांगुर्डे आणि पराग कुलकर्णी.
​धुळे कारागृह : राजीफ शेख, निशांत भारती, आयुष भारती, शाहिद शेख, अक्षय गोसावी आणि साद पठाण.
​नंदुरबार कारागृह : साहिल शेख.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी...